पुष्पा 2 हा अतिशय चांगला व एकदम हिट असा सिनेमा आहे. मला हा सिनेमा खूप आवडला. या सिनेमासारखा दुसरा कुठला सिनेमा आतापर्यंत पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकानं सांगितलं. तर पुष्पा 2 हा सिनेमा पुष्पा सिनेमाच्या पहिल्या भागापेक्षाही चांगला झाला आहे. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांनी अतिशय उत्तम अभिनय केला आहे. त्यामुळे मला हा सिनेमा अतिशय आवडला, असं देखील एका चाहत्यानं सांगितलं.
advertisement
Pushpa 2ने रिलीजआधीच मोडला रेकॉर्ड, 1M हून अधिक बुकिंग, एका तिकीटाची किंमत किती?
पुष्पा 2 सारखा चित्रपट बॉलिवूडमध्ये होणे नाही. आतापर्यंतचे कमाईचे सगळे रेकॉर्ड हा चित्रपट मोडणार आहे. चित्रपटातील गाणी, अभिनय आणि संगीत सगळंच भारी आहे. त्यामुळे सर्वांनी हा सिनेमा आवर्जून चित्रपटगृहांत जावून पाहावा, असं एक चाहता म्हणाला. तर पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग जिथं संपला तिथूनच दुसरा भाग सुरू होतोय. चित्रपटाचं कथानंक आणि अभिनय खूप चांगला झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो. अगदी पैसा वसूल चित्रपट असल्यानं सर्वांनी पाहावा, असा असल्याचंही एका चाहत्यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
दरम्यान, पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर चाहते पुष्पा 2 या चित्रपटाची वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वीच 100 कोटींची कमाई चित्रपटाने केली होती. त्यामुळे सर्वांचं लक्ष प्रदर्शनावर होतं. आज पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला असून चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकींग जोरात सुरू आहे.
Pushpa 2 Online Leak: 'पुष्पा 2' च्या मेकर्सना कोट्यवधीचा फटका! रिलीज होत नाही तोच Movie Online Leak





