पुष्पा या चित्रपटात अभिनेता फहाद फासिल पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आता लवकरच तो पुष्पा २ मध्ये दिसणार आहे. आता लवकरच फहाद फासिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशी बातमी आहे की लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अलीने फहादला त्याच्या आगामी चित्रपटासाठी विचारले आहे. दरम्यान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नावही समोर आले आहे.
advertisement
नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, इम्तियाज अली 'ॲनिमल' फेम नॅशनल क्रश म्हणजेच तृप्ती दिमरीला त्याच्या चित्रपटात फहादसोबत कास्ट करणार आहे. इम्तियाज केवळ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेणार नाही, तर तो या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून केवळ इम्तियाजच नाही तर फहाद आणि तृप्तीच्या चाहत्यांनाही ही कथा कशी असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
वृत्तांनुसार, या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता निर्मात्यांनी फहद आणि तृप्तीला चित्रपटासाठी फायनल केले आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला अंतिम टच बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.