Priyanka Chopra : तब्बल 5 वर्षांनी प्रियांकाचं बॉलिवूडमध्ये Come Back! नव्या चित्रपटाबाबत केला मोठा खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priyanka Chopra Comeback: प्रियांका चोप्रा एक ग्लोबल आयकॉन आहे. हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली.
Priyanka Chopra Comeback: प्रियांका चोप्राची फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठी फॅन फॉलोविंग आहे. प्रियांका चोप्रा एक ग्लोबल आयकॉन आहे. हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर प्रियांका बॉलिवूडमधून गायब झाली. गेल्या काही वर्षांपासून तिने एकही बॉलिवूड सिनेमा केला नाहीये. अशातच एक बातमी समोर येत आहे, ज्यानुसार प्रियांका आता लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. याबाबत स्वतः प्रियांका चोप्राने खुलासा केला आहे.
एचटी सीटीशी बोलताना प्रियांका चोप्रा म्हणाली की ती पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. प्रियांका म्हणाली, “मी खोटं बोलत नाहीये. मी अनेक फिल्म मेकर्सना भेटतेय आणि मी बऱ्याच स्क्रिप्ट्सही वाचल्या आहेत. मला हिंदीत काहीतरी करायचे आहे ते मी सक्रियपणे शोधत आहे. हे वर्ष माझ्यासाठी खूप व्यस्त होते. ”
advertisement
प्रियांकाला जेव्हा विचारण्यात आले की ती जी ले जरा संदर्भात हिंट देत आहे का, तेव्हा ती म्हणाली - “तुम्ही याविषयी एक्सेलशी बोलले पाहिजे.” यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रियांका चोप्रा फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
२०२१ मध्ये 'जी ले जरा'ची घोषणा करण्यात आली. या चित्रपटातील कलाकारांमुळे घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाने खळबळ उडाली होती. मात्र, कलाकारांच्या तारखा मॅच न झाल्याने या चित्रपटाला विलंब झाला आहे. तथापि, झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांनी आश्वासन दिले आहे की चित्रपट स्थगित केला गेला नाही आणि सर्वांचे वेळापत्रक एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 4:45 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priyanka Chopra : तब्बल 5 वर्षांनी प्रियांकाचं बॉलिवूडमध्ये Come Back! नव्या चित्रपटाबाबत केला मोठा खुलासा