TRENDING:

VIDEO : झुकेगा नही साला! वर्ध्याच्या पुष्पाने नादच केला, थेट अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचला, पण रस्त्यावर का बसला?

Last Updated:

Allu Arjun fan : वर्ध्याच्या अजय मोहितेने 'पुष्पा' चित्रपटाने प्रेरित होऊन अल्लू अर्जुनचा लूक आत्मसात केला. हैदराबादला जाऊन अखेर अल्लू अर्जुनला भेटला. अल्लूने अजयच्या मेहनतीचं कौतुक केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : "स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटत राहा," हे वाक्य अनेकदा ऐकायला मिळतं, पण वर्ध्याच्या अजय मोहितेने ते प्रत्यक्षात उतरवून दाखवलं आहे. दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा जबरा फॅन असलेल्या अजयने 'पुष्पा' चित्रपटाने प्रेरित होऊन आपल्या आयुष्यात असा काही झपाटलेपणा आणला की, त्याचा प्रवास सध्या सगळ्यांना प्रेरणा देतो आहे.
वर्ध्याच्या अजय मोहितेने 'पुष्पा' चित्रपटाने प्रेरित होऊन अल्लू अर्जुनचा लूक आत्मसात केला.
वर्ध्याच्या अजय मोहितेने 'पुष्पा' चित्रपटाने प्रेरित होऊन अल्लू अर्जुनचा लूक आत्मसात केला.
advertisement

‘पुष्पा’ चित्रपट पाहिल्यानंतर अजय इतका प्रभावित झाला की, त्याने अल्लू अर्जुनचा लूक आत्मसात केला. या लूकमध्ये त्याने तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अजयला एक ओळख मिळाली ती म्हणजे 'वऱ्ध्याचा पुष्पा'. मात्र, अजयचा खरा उद्देश होता त्याच्या आयडॉलला प्रत्यक्ष भेटण्याचा. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजय थेट हैदराबादला पोहोचला.

advertisement

अल्लू अर्जुनच्या घरासमोरच बसून राहिला

हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनच्या घरासमोर त्याने अनेक तास ताटकळत बसून राहण्याचा निर्णय घेतला. गार्डने त्याला दूर हटवलं, तरीही अजय मागे हटला नाही. त्याने अल्लू अर्जुनच्या ऑफिसचा शोध घेतला आणि तिथे त्यांच्या वडिलांशी म्हणजेच अरविंद अल्लू यांच्याशी भेट झाली. "जेवलास का?" असा प्रेमळ प्रश्न त्यांनी विचारला आणि जेवण न केलेल्या अजयसाठी खास बिर्याणी मागवण्यात आली.

advertisement

अश्लीलतेची हद्द पार! कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्मांची 'घृणास्पद' कमेंट! नेटकऱ्यांनी धू धू धुतलं

अल्लू अर्जुनला भेटल्यानंतर अजयची स्वप्नपूर्ती

त्यानंतर तो क्षण आला. अल्लू अर्जुन त्यांच्या गाडीतून उतरले आणि अजयला त्यांच्याशी भेटण्याचं आमंत्रण मिळालं. उत्साह, आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या त्या क्षणात अजयने अल्लू अर्जुनला त्याचा गांधी चरखा भेट दिला. आपल्या मोबाईलमधील प्रोफाइल त्यांना दाखवलं आणि अल्लू अर्जुनही त्याच्या हुबेहूब लूक आणि समर्पणाने थक्क झाला. या भेटीत अल्लूने अजयच्या मेहनतीचं कौतुक केलं आणि त्याच्या लूकला अप्रतिम म्हटलं. अजयसाठी ही भेट म्हणजे स्वप्नपूर्तीचं सर्वोच्च शिखर होतं. "मी आता खरंच 'पुष्पा'च्या जगात गेलो," असं अजय हसत म्हणतो.

मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : झुकेगा नही साला! वर्ध्याच्या पुष्पाने नादच केला, थेट अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचला, पण रस्त्यावर का बसला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल