अश्लीलतेची हद्द पार! कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्मांची 'घृणास्पद' कमेंट! नेटकऱ्यांनी धू धू धुतलं

Last Updated:

Kiara Advani Look from War 2 : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा 'वॉर 2' चित्रपटाच्या टीझरमधील कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर अश्लील टिप्पणी केल्याने वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून त्यांनी पोस्ट हटवली आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा 'वॉर 2' चित्रपटाच्या टीझरमधील कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर अश्लील टिप्पणी केल्याने वादात सापडले आहेत.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा 'वॉर 2' चित्रपटाच्या टीझरमधील कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर अश्लील टिप्पणी केल्याने वादात सापडले आहेत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत असलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी कारण ठरलंय ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर आणि त्यात झळकलेली अभिनेत्री कियारा अडवाणीचा बिकिनी लूक. कियाराच्या लूकवर राम गोपाल वर्मा यांनी केलेली अश्लील प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.
‘वॉर 2’ या अ‍ॅक्शनपटाच्या टीझरमध्ये कियारा अडवाणी एका पूलसाइड सीनमध्ये बिकिनीमध्ये झळकली आहे. तिच्या या बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असतानाच, राम गोपाल वर्मा यांनी यावर अश्लील आणि अनुचित टिप्पणी करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. काही वेळातच युजर्सनी त्यांच्यावर संतापले आणि अनेकांनी त्यांना त्यांच्या वयाचे भान ठेवण्याचा सल्ला दिला.
advertisement

काय होती राम गोपाल वर्मा यांची कमेंट?

एका युजरने संतप्त प्रतिक्रिया देताना लिहिले, “जो व्यक्ती इतक्या सार्वजनिक ठिकाणी अशी भाषा वापरतो, तो खाजगी आयुष्यात काय विचार करत असेल याचा विचारच करवत नाही.” दुसऱ्याने लिहिले, “तुमची मानसिक स्थिती तपासून घ्या.” अशा अनेक कमेंट्समुळे अखेर राम गोपाल वर्मा यांनी आपली वादग्रस्त पोस्ट हटवली. पण एकदा पसरलेला वाद इतक्या सहज थांबेल का?
advertisement
कियाराच्या चाहत्यांनीही या प्रकरणात एकजुटीने आवाज उठवला आहे. सोशल मीडियावर #KiaraAdvani ट्रेंड होऊ लागले असून, अनेकांनी अशी मागणी केली आहे की, सेलिब्रिटी असो वा सामान्य, कोणत्याही महिलेविषयी अश्लील किंवा अपमानास्पद टिप्पणी टाळायला हवी.
advertisement

कधी रिलीज होणार War 2?

दरम्यान, कियारा अडवाणीचा बिकिनी लूक असलेला ‘वॉर 2’ टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत तर दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर 2’ येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरला अवघ्या २४ तासांत २० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटाच्या यशावर पाणी फेरण्याचे काम सध्या राम गोपाल वर्मांच्या वक्तव्याने केल्याचे अनेकांचे मत आहे. आता या प्रकरणावर ते औपचारिक माफी मागतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अश्लीलतेची हद्द पार! कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्मांची 'घृणास्पद' कमेंट! नेटकऱ्यांनी धू धू धुतलं
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement