सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद आहे. अशातच पुष्पा स्टार अल्लू अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अल्लू अर्जुनच्या कुटुंबात एक दुःखद घटना घडली आहे. अल्लू अर्जुनची आजी अल्लू कनकरत्नम यांचे शनिवारी 30 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आजीचं पार्थिव अल्लू अरविंदच्या घरी आणण्यात आलं आहे. आज दुपारी कोकापेट येथे त्यांच्यांवर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
advertisement
आजीच्या निधना झालं तेव्हा अल्लू अर्जुन मुंबईत होता. ही दुःखद बातमी मिळताच त्यानं आपली सगळी काम आणि कार्यक्रम रद्द करून तो तात्काळ हैदराबादला रवाना झाला.
( 2 महिन्यांआधी जग सोडून, तरी परागने शेफालीसोबत केली बाप्पाची आरती; इमोशनल करणारा VIDEO VIRAL )
अल्लू अर्जुनचा चुलत भाऊ राम चरणही त्यावेळी हैदराबादमध्ये उपस्थित नव्हता. तो म्हैसूरमध्ये दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या 'पेड्डी' चित्रपटाचे शूटिंग करत होता. पण आजीच्या मृत्यूची बातमी कळताच त्यानं देखील शूटींग थांबवलं आणि हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला.
आज अंत्यसंस्कार
मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू कंकररत्नम यांचे शनिवारी पहाटे 1.45 वाजता वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. असं सांगितले जात आहे की, चिरंजीवी सध्या अल्लू अरविंद यांच्यासोबत आहेत आणि अंत्यसंस्काराची तयारी करत आहेत. यावेळी पवन कल्याण आणि नागा बाबू एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी विशाखापट्टणमला गेले आहेत. ते उद्या कुटुंबाला भेट देऊन श्रद्धांजली वाहणार आहेत.
Allu Arjun's grandmother does the Drishti ritual to remove negative energy.#AlluArjun #AlluArjun