2 महिन्यांआधी जग सोडून, तरी परागने शेफालीसोबत केली बाप्पाची आरती; इमोशनल करणारा VIDEO VIRAL

Last Updated:

Shefali Jarowala Husband Parag Tyagi Ganpati Video : शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पराग त्यागीने तिच्या आठवणी जपून गणेश चतुर्थी साजरी केली. सोशल मीडियावर त्याने व्हिडीओ शेअर केला आहे.

News18
News18
मुंबई : शेफाली जरीवालाच्या निधनाला 2 महिने झाले आहेत. पण तिचा नवरा पराग त्यागी आजही तिच्या आठणीत आहे. शेफालीच्या निधनानंतर पराग किती वेदना सहन करत असेल याची कोणीही कल्पना करू शकत नाही. पण पराग आजही शेफालीला आठवणींमधून आणि इतर गोष्टींमधून जीवंत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याने काही दिवसांआधी त्याच्या छातीवर त्याच्या शेफालीचा फोटो टॅटू म्हणून काढला. त्यांच्या घरी दरवर्षी गणपती बसवत होते पण शेफालीच्या मृत्यूनंतर गणपती बसवणार का असा प्रश्न सर्वांना पडला. पण शेफालीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं असं ठरवून परागने घरी गणपती बसवला. अभिनेत्याने गणेश चतुर्थी थाटामाटात साजरी करून तिची इच्छा पूर्ण केली. शेफाली जरी या जगात नसली तरी त्याने तिच्याबरोबर गणपती बाप्पाची आरती केली.
पराग त्यागीने सोशल मीडियावर गणेश चतुर्थी साजरी करण्याचा एक व्हिडिओ शेअर केला.  व्हिडिओमध्ये तो  जड अंतःकरणाने आणि दुःखी डोळ्यांनी बाप्पाची पूजा करताना दिसत आहे. त्याने लिहिलंय, "परीला नेहमीच असं वाटत होतं की बाप्पाचं आगमन आणि त्यांच्या आशीर्वादांची सीरिज कधीही थांबू नये. या वर्षीही बाप्पानं येऊन तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला माझ्या बाळा... आम्ही सर्वांनी एकत्र विसर्जन केलं. नेहमी हसत राहा. आई सुनीता जरीवाला यांनी खूप मेहनत घेतली होती." बाप्पाची पूजा करताना परागने छातीवर काढलेल्या शेफालीच्या टॅटूवर एक हात ठेवला होता. जणू काही शेफाली त्याच्याबरोबरच आहे आणि तो तिच्याबरोबर बाप्पाची आरती करत आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Pari aur Simba ke Papa (@paragtyagi)



advertisement
परागने शेअर केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांचं प्रेम मिळतंय. चाहत्यांनी व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कमेंट करताना एका युझरने लिहिलंय, "हा माणूस अविश्वसनीय आहे. मी आजपर्यंत असा माणूस कधीच पाहिला नाही. आजच्या काळात इतके प्रेम करणारा माणूस कुठे सापडतो" दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "त्यांचे प्रेम पाहून नेहमीच अश्रू येतात."
advertisement
अभिनेत्री आरती सिंगनेही पराग त्यागीच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. ती लिहिते, "शेफू... ती नेहमीच तुमच्यासोबत असते. सीआयडी आणि अनुपमा फेम जसवीर कौरने "गणपती बाप्पा मोरया" अशी कमेंट केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
2 महिन्यांआधी जग सोडून, तरी परागने शेफालीसोबत केली बाप्पाची आरती; इमोशनल करणारा VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement