याच पार्श्वभूमीवर आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत, जी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. हिंदी सिनेमाचे बादशाह म्हणून ओळख असणारे राज कपूर त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्या काळातील दिग्गज अभिनेत्री नर्गिस यांच्यासोबत त्यांचे नाव जोडले जायचे. मात्र एक वेळ अशी आली होती की राज कपूर नर्गिस यांच्यासाठी रात्र रात्र जागून रडायचे.
advertisement
नर्गिस आणि राज कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. या दरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यावेळी अशाही अफवा पसरल्या होत्या की दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र त्यांना एकमेकांशी लग्न करता आले नाही. त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर हिट ठरली. पण वास्तवात ते एकत्र आले नाहीत. १९५८ साली नर्गिस यांनी सुनिल दत्त यांच्याशी लग्न केले. यानंतर राज कपूर यांची अवस्था वाईट झाली होती.
असे म्हटले जाते की नर्गिस यांनी राज कपूर यांना धोका दिला. त्यानंतर राज कपूर स्वतःला सांभाळू शकले नाहीत. या घटनेचा त्यांच्यावर वाईट परिणाम झाला. ते बाथरूममध्ये जाऊन रडायचे. इतकंच नाही, तर त्यांना जळत्या सिगरेटने स्वतःला भाजूनही घेतलं होतं.
मधु जैन यांच्या ‘द कपूर्स: द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकानुसार, नर्गिससोबत ब्रेकअप झाल्यानंतर राज कपूर यांनी एका पत्रकाराला सांगितले होते की, “लोक असे मानतात की त्यांनी नर्गिसला निराश केले आहे. पण तिने माझी फसवणूक केली हे सत्य आहे.” नर्गिसच्या लग्नाची बातमी ऐकून राज कपूर आपल्या मित्रांसमोर रडले. वेदना सहन करण्यासाठी, त्याने सिगारेटने स्वतःला भाजण्यास सुरुवात केली.
या सर्व प्रकारानंतर राज कपूर खूप मद्यपान करू लागले. त्यामुळे पत्नी कृष्णा कपूर आणि कुटुंबीयही चिंतेत पडले. त्यांच्या पत्नीने रुबेनला सांगितले होते की, “ते नशेत येतात आणि बाथटबमध्ये बेशुद्ध पडतात. ते रात्रभर खूप रडतात आणि हे दररोज रात्री घडते.”
पुस्तकानुसार, राज कपूरचे खरे प्रेम नर्गिस होते आणि ते त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी पत्नीला सोडण्यासही तयार होते. सार्वजनिक व्यासपीठावर त्यांनी नर्गिसविरोधात एक शब्दही बोलला नव्हता. मात्र त्यांनी नर्गिसच्या भावांवर आरोप केले होते. भाऊंनी दोघांमध्ये तेढ निर्माण केली, असा त्यांचा समज होता.