सूरज चव्हाण नुकताच 'राजा राणी' सिनेमात झळकला. या सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सूरजला आयफोन 16 प्रो मॅक्स गिफ्ट दिला. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, सूरज गिफ्ट उघडतो आणि सगळे त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करतात. सूरज सगळ्यांचे आभारही मानतो आहे. सूरज म्हणतो, "मनापासून मी सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही मला इतका पाठिंबा दिला. मला खूप बरे वाटतेय." व्हिडिओमध्ये दिसतेय की सूरजला गिफ्ट मिळालेल्या मोबाईलचे नावही त्याला उच्चारता येत नव्हते. ते पाहून सगळेच हसायला लागतात.
advertisement
दरम्यान, सूरज चव्हाण एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तो त्याच्या हटके 'झापूक झुपूक' स्टाइलमुळे लोकांचे लक्ष वेधत असतो. त्याचा 'गोलीगत' पॅटर्न तर खूपच फेमस आहे. बिग बॉसमुळे आता सूरजला चांगल्या नव्या सिनेमांच्या ऑफरही येऊ लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात तो बऱ्याच नव्या प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.