"दुसऱ्या हनिमूनसाठी..." अनिकेत विश्वासरावची पहिली बायको दुसऱ्या लग्नामुळे ट्रोल, घाणेरड्या कमेंट व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अभिनेत्री स्नेहा चव्हाण पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. हे तिचे दुसरे लग्न असून अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर तिचं पहिलं लग्न झालं होतं.
दिवाळीनंतर सुरू होते ती लग्नसराई. या दिवसांमध्ये अनेक लोक लग्न करतात. याच औचित्यावर अभिनेत्री स्नेहा चव्हाण पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. यासंबंधी तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हे तिचे दुसरे लग्न असून अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर तिचं पहिलं लग्न झालं होतं.
स्नेहा चव्हाण १० नोव्हेंबरला मानससोबत विवाहबंधनात अडकली. अगदी साध्या घरगुती समारंभात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. ज्यामध्ये तिचे कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळीच उपस्थित होते. यावेळी तिने गडद जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचं ब्लाऊज असा पेहराव केला होता. तिचा पती मानसने यावेळी लेव्हेंडर रंगाची शेरवाणी घातली होती.
advertisement
स्नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे भरपूर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अनेकांनी तिला तिच्या नव्या प्रवासाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र नेटकऱ्यांनी तिला आणि तिच्या पतीला ट्रोल करत आहेत. स्नेहाच्या पती मानसला त्याच्या दिसण्यावरून आणि स्नेहाला तिच्या दुसऱ्या लग्नामुळे ट्रोल केलं जात आहे.
advertisement
अनेक यूजर्सनी तिच्या पोस्टवर काही आक्षेपार्ह्य कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं, पुन्हा एकदा अभिनंदन. तर दुसऱ्याने म्हटलं, हा कट्टपा कोण आता. तिसऱ्याने लिहीलं आहे, मॅडम आता हॅट्रिक तर झालीच पाहिजे. आणखी एकाने लिहलंय, पुन्हा एकदा हनिमून च्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारच्या अनेक कमेंट त्या पोस्टवर आहेत.


advertisement
स्नेहाचे पहिले लग्न हे अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर झाले होते. लग्नाच्या 2-3 महिन्यातच त्यांच्यात वाद झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत पैशांची मागणी केली होती. स्नेहाने अनिकेतच्या आईवर मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. अनिकेतने मात्र हे सगळे आरोप फेटाळले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2024 10:37 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
"दुसऱ्या हनिमूनसाठी..." अनिकेत विश्वासरावची पहिली बायको दुसऱ्या लग्नामुळे ट्रोल, घाणेरड्या कमेंट व्हायरल