लाखो दिलांची धडकण आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता. कित्येक तरुणी त्याच्या मागे लागायच्या. या सुपरस्टारचे नाव आहे राजेश खन्ना. अभिनय क्षेत्रातील एक रत्न. त्याचे चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालायचे. त्यांच्या चित्रपटाचे तिकीटही मिळायचे नाही. त्यांचे एवढे चाहते होते की ते जातील तिथे चाहत्यांची लाईन लागायची. त्यांना भेटण्यासाठी पूर्ण शहर हे जाम होऊन जायचे. एकदा तर ते पुण्यात गेल्यावर सगळं पुणे शहर जाम झाले होते. हे त्यांच्यासोबतच्या एका सहाय्यक अभिनेत्याने सांगितले.
advertisement
एक सहाय्यक अभिनेता म्हणाला, " या अभिनेत्या एवढं कोणालाच चाहता वर्ग मिळाला नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकं अगदी गाडिच्या टायरला लटकून येत होती. त्यांच्यासाठी तरुणी वेड्या होत्या. एवढेच नव्हते सर्व कॅमेरे हे त्यांच्याकडेच वळायचे. एकदा तर त्यांना एका चित्रपटाच्या शूटींगला जाण्यासाठी चक्क पॅरामिलीटरी फोर्सच बोलवावी लागली होती."
अभिनेते सत्यजीत पुरी यांनी सागितला ती घटना
अभिनेते आणि दिग्दर्शक सत्यजीत पुरी यांनी 'फ्राइडे टॉकीज' सोबत बोलताना म्हणाले, "राजेश खन्नांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. खन्ना पुण्यात शक्ति सामंत यांच्या एका चित्रपटाच्या शूटींगला जात होते. तेव्हा लोकांना समजले की खन्ना पुण्यात राहणार आहेत. तर, अख्खं पुणे शहर जाम झाले होते. राजेश खन्नांना वाचवण्यासाठी पॅरामिलीटरी फोर्स तैनात करावी लागली. खन्नांना दुपारी 2 वाजता पोहचायचे होते, पण ते सेटवर 8 वाजता पोहचले. आमच्या ड्राईव्हलाच विचारा इथपर्यंत कसे आलो."
त्यांनी पद्मिना कोल्हापुरे यांच्यासोबतही 'सौतन' चित्रपटात काम केले होते. अभिनेत्री कोल्हापुरेनीही त्याचे भरभरुन कौतुक केले होते.
