देवानंदचा काळा कोट कोर्टाने केलेला बॅन, त्याला पाहण्यासाठी तरुणी छतावरून मारायच्या उड्या
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dev Anand : 1950 ते 1960 च्या दशकात देव आनंद यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. आपल्या दर्जेदार अभिनयाने आणि स्टाईलने त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. त्यावेळी लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी वेडे व्हायचे. पण एकदा कोर्टाने त्यांच्या काळ्या कपड्यांवर बंदी घातली होती.
ट देव आनंद हे 1950-1950 च्या दशकातील चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. आपल्या अभिनयाने त्यांनी त्याकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. देव आनंद यांचा अभिनय आणि स्टाइल प्रत्येक प्रेक्षकांचं मन जिंकणारा होता. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे व्हायचे. एकंदरीतच त्याकाळचे ते सर्वात स्टाइलिश हिरो होते. पण आपल्या स्टाईलमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
advertisement
देव आनंद यांच्या अनेक गोष्टी लोकप्रिय होत्या. त्यातील एक म्हणजे त्यांची फॅशन आणि त्यांचे काळे कपडे. देव आनंद यांचा पांढरा शर्ट आणि त्यावर काळा कोट असणारा लूक त्यावेळी खूप लोकप्रिय होता. देव आनंद यांचा काळ्या रंगाचा गेटअप इतका लोकप्रिय झाला की चक्क त्यांच्यावर काळा कोट घालण्यापासून बंदी घालण्यात आली होती.
advertisement
advertisement
advertisement


