राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल
राखी सावंत व्हिडीओमध्ये म्हणतेय,"तुम्ही आधी स्वत:ला सुधारा. त्यानंतरच मला असे काहीही अर्थ नसलेले प्रश्न विचारा. समजलं का? नाहीतर मी ही गदा फेकून मारेल". राखी सावंत बोलत असताना मागून कोणीतरी म्हणतंय की,"पाहा गब्बर हसतोय". त्यानंतर राखी सावंत गब्बर कुठे आहे? असं विचारताना दिसत आहे. त्यानंतर सर्वजण राखी सावंतच्या वक्तव्यावर हसताना दिसत आहेत. राखीचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर धमाका करत आहे.
advertisement
दसऱ्यानिमित्त राखी सावंतने रावण लूक केला आहे. तिने रावणाचा दहा तोंडे असलेला मुखवटा घातला आहे. तसेच तिच्या हातात गदाही आहे. राखी सावंत दुबईहून मुंबईत परतली आहे. राखी नुकतीच 'पति पत्नी और पंगा'च्या सेटवर दिसून आली. त्यावेळी राखी 'बिग बॉस 19'ची स्पर्धक तान्या मित्तलची शाळा घेताना दिसून आली. राखी सावंतने ट्रंप आपले वडील असल्याचा दावा केला होता. तसेच दुबईत आपली खूप प्रॉपर्टी असून 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार असल्याचंही राखी म्हणाली होती.