साउथ मेगास्टार राम चरणचा आगामी चित्रपट 'गेम चेंजर' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता आणि कार्यक्रमानंतर मोठा अपघात झाला. कार्यक्रमाला आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला. गेम चेंजरचे निर्माते दिल राजू यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे.
advertisement
काकिंडा येथील गायगोलुपडू येथील 23 वर्षीय अरवा मणिकांत आणि 22 वर्षीय ठोकडा चरण अशी या दोन चाहत्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनने त्यांना धडक दिली. दोघांनाही तात्काळ पेद्दापुरम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जास्त गंभीर जखमेमुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही. याप्रकरणी रंगमपेटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेम चेंजरच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या दिल राजूने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊस, श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सच्या अधिकृत X अकाऊंटवर एक पोस्ट करत सांगितलं, “निर्माता #DilRaju garu ने ₹10 लाखांची घोषणा केली आणि अपघातात दुःखदपणे आपला जीव गमावलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतीची हमी दिली. #GameChanger इव्हेंट. या कठीण काळात त्यांच्या प्रियजनांप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो."
याव्यतिरिक्त, दिल राजूने शोक व्यक्त केला आणि म्हणाला, “मला नुकतेच कळले की कार्यक्रमानंतर, परत येत असताना, दोन सदस्यांचे दुःखद निधन झाले. म्हणूनच पवन कल्याण यांनी मला विचारले की या कार्यक्रमाला पर्याय आहे का, कारण एवढ्या मोठ्या घटनेनंतर एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा ते किती दु:खदायक असते. पवन कल्याण यांनी पीडित कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.