Allu Arjun New Look: 4 वर्षानंतर अल्लू अर्जुनने बदलला लूक, 'पुष्पराज' हटके स्टाइलमध्ये पोहोचला पोलीस स्टेशन, पाहा video

Last Updated:

Allu Arjun New Look:‘पुष्पा 2’ च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनवर आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणी 3 जानेवारीला अल्लू अर्जुनला कोर्टाने जामीन मंजूर केला.

 4 वर्षानंतर अल्लू अर्जुनने बदलला लूक
4 वर्षानंतर अल्लू अर्जुनने बदलला लूक
मुंबई : ‘पुष्पा 2’ च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनवर आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणी 3 जानेवारीला अल्लू अर्जुनला कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यामुळे अभिनेत्यासाठी ही मोठा दिलासा देणारी बातमी आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर आता एकदा अल्लू अर्जुन पोलीस स्टेशनची फेरी करताना दिसला. मात्र यावेळी अल्लू अर्जुनच्या नव्या, हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
‘पुष्पा 2’ सिनेमासाठी अल्लू अर्जुनने त्याची दाढी आणि केसही वाढवले होते. या सिनेमासाठी त्याने खूप मेहनत घेत हा लूक सेट केला होता. अखेर सिनेमा रिलीजनंतर आणि बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याचा लूक बदलला आहे. त्याने दाढी आणि लांब केस कट केले. या नव्या लूकमध्ये अल्लू अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचला. यावेळी त्याच्या या लूकने चाहत्यांची मने जिंकली.
advertisement
पुष्पा 2 स्टार लहान केस आणि ट्रिम केलेल्या दाढीसह नामपल्ली कोर्टात हजर झाला होता. यावेळीचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये त्याच्या नव्या लूकचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. चाहत्यांनी त्याच्या नव्या लूकचे कौतुक केले.
advertisement
दरम्यान, अल्लू अर्जुनला दिलासा मिळाला असला तरी, त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्याची मनाई आहे. प्रत्येक रविवारी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन स्वाक्षरी करावी लागणार आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 च्या प्री-स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा सध्या एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आहे. या प्रकरणी अल्लू अर्जुन चांगलाच अडकला होता. मात्र आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun New Look: 4 वर्षानंतर अल्लू अर्जुनने बदलला लूक, 'पुष्पराज' हटके स्टाइलमध्ये पोहोचला पोलीस स्टेशन, पाहा video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement