Pushpa 2 Stampede Case : अल्लू अर्जुनसमोर आता नवी अडचण; जामीन मिळाला पण 'सुटका' नाही, पोलिसांचा मोठा निर्णय

Last Updated:

Pushpa 2 Stampede Case Update :अल्लूला आता जामीन मिळाला असला तरी त्याचा चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजेरी लावावी लागत आहे.  अल्लू अर्जुन रविवारी चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या प्रभारींसमोर हजर झाला.

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन
मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असताना दुसरीकडे पुष्पा 2च्या  प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. अल्लूला आता जामीन मिळाला असला तरी त्याचा चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजेरी लावावी लागत आहे.  अल्लू अर्जुन रविवारी चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या प्रभारींसमोर हजर झाला. कोर्टाची औपचारिकता पूर्ण करून तो निघून गेला. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 11 म्हणून नाव असलेल्या अर्जुनला शहर न्यायालयाने 3 जानेवारी रोजी नियमित जामीन मंजूर केला होता.
न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्लू अर्जुनला दोन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागत होते.

अल्लू अर्जुन परदेशात जाऊ शकणार नाही

याशिवाय न्यायालयाने अल्लू अर्जुनला न्यायालयाला न कळवता त्याचा निवासी पत्ता बदलू नये असे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे परवानगीशिवाय परदेशात जाण्यासही मनाई केली. या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत या अटी लागू राहतील.
advertisement

4 डिसेंबरला नेमकं काय झालं?

4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या प्रीमियरच्या वेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्याच्या शर्यतीत चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिचा 9 वर्षांचा मुलगा जखमी झाला. मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सुमारे 20 दिवसांनंतर त्याच्या वडिलांनी सांगितले की आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. अल्लू अर्जुनचे कुटुंब त्याला खूप मदत करत असल्याचेही सांगण्यात आले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 Stampede Case : अल्लू अर्जुनसमोर आता नवी अडचण; जामीन मिळाला पण 'सुटका' नाही, पोलिसांचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement