advertisement

Allu Arjun: मोठी बातमी! 'पुष्पा 2' स्क्रिनिंग चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला दिलासा, जामीन मंजूर

Last Updated:

Allu Arjun Granted Bail: 'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी गेल्या काही काळापासून वाढताना दिसत होत्या. 'पुष्पा 2' च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनवर आरोप लावण्यात आले होते.

'पुष्पा 2' स्क्रिनिंग चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला जामीन मंजूर
'पुष्पा 2' स्क्रिनिंग चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला जामीन मंजूर
मुंबई :  'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी गेल्या काही काळापासून वाढताना दिसत होत्या. 'पुष्पा 2' च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनवर आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. त्यानंतर तो अंतरिम जामिनावर बाहेर होता. आता या प्रकरणी मोठी बातमी समोर आलीय. अखेर या प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे.
'पुष्पा 2' च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला नामपल्ली कोर्टाने अभिनेत्याला जामीन मंजूर केला आहे. नामपल्ली कोर्टात आज संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या बाजूने निर्णय दिला आणि अभिनेत्याला  जामीन मंजूर केला.
advertisement
न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला असून चेंगराचेंगरी प्रकरणात कोर्टाने त्याच्या बाजूने निर्णय दिला आहे.
दरम्यान, 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा-2 प्रदर्शित झाला. पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच संदर्भात अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणीच पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अल्लू अर्जुन पोलिसांना न सांगता प्रीमियरला गेला होता, असा पोलिसांचा आरोप होता.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun: मोठी बातमी! 'पुष्पा 2' स्क्रिनिंग चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला दिलासा, जामीन मंजूर
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement