पापाराझी मानव मंगलानी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की हे फोटो कुठल्या पर्यटकांनी किंवा पत्रकारांनी काढले नव्हते. तर रणबीर–कतरिनाच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेच ते मीडियाला दिले होते. त्याने कोणत्या व्यक्तीने फोटो लीक केले हे मात्र स्पष्ट केले नाही. पण एवढ्या मोठ्या लीकनंतर त्यासारखं दुसरं प्रकरण पुन्हा घडलं नाही, असंही त्याने सांगितलं.
advertisement
वीकेंडला Inspector Zende पाहण्याचा करताय प्लॅन? मग आधी हा Review वाचाच
त्या काळात हे फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरले. चाहत्यांनी दोघांच्या केमिस्ट्रीवर कौतुकाचा वर्षाव केला, तर अनेकांनी त्यांच्या खाजगी आयुष्यावर झालेल्या अतिक्रमणावर जोरदार टीका केली. स्वतः कतरिना कैफने एक ओपन लेटर लिहून नाराजी व्यक्त केली होती. तिने माध्यमांना ‘स्टार्स सार्वजनिक व्यक्तिमत्व असले तरी, त्यांचे खाजगी क्षण जपले गेले पाहिजेत’ असं स्पष्ट सांगितलं. रणबीरनेही याला विश्वासघात म्हणत तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
या घटनेमुळे भारतात पापाराझी संस्कृती, मीडिया एथिक्स आणि सेलिब्रिटी प्रायव्हसी यावर मोठी चर्चा झाली. डिजिटल युगात एका क्लिकवर वैयक्तिक क्षण व्हायरल होऊ शकतो, हे या घटनेने सगळ्यांना जाणवलं.वादाच्या गदारोळातही रणबीर आणि कतरिनाने आपापली करिअरवर फोकस केला. मात्र, काही वर्षांनी त्यांचं नातं संपलं. तरीही, फोटोंचा किस्सा आजही बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लीकपैकी एक मानला जातो.