1997 साली आलेल्या 'राजा की आएगी बारात' या चित्रपटात एक दृश्य आहे, जिथे राणी मुखर्जी नायकाच्या पायातून सापाचं विष तोंडाने शोषते. हे दृश्य आजही अनेकांना आठवतं आणि हास्यास्पद वाटतं. डॉ. श्रीराम नेने, जे पेशाने हृदयविकारतज्ज्ञ असून अमेरिकेत एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेतत, त्यांनी या दृश्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडची बोल्ड क्वीन, आता ओळखणंही झालं कठिण, लग्नानंतर अभिनेत्रीसोबत घडलं तरी काय?
advertisement
त्यांनी या दृश्याचा व्हिडीओ शेअर करत हसत सांगितलं, "हे जुनी गोष्ट वाटते. जिथे असं मानायचं की साप चावल्यावर विष तोंडाने शोषलं की माणूस वाचतो." पण प्रत्यक्षात असं काहीही होत नाही.
डॉ. नेने सांगतात, साप चावल्यावर शरीरात काही क्षणांतच विष पसरायला सुरुवात होते. आणि जेव्हा एकदा न्यूरोलॉजिकल किंवा इतर लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा विषाचा प्रभाव सुरू झालेला असतो. त्यांचे म्हणणे आहे, "खरं तर अशावेळी तात्काळ रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. रस्त्यात टॉर्निकेट लावून रक्तप्रवाह थांबवणं शक्य असेल तर ते करावं. हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या अँटीव्हेनमद्वारेच योग्य उपचार होतो."
शेवटी डॉ. नेने म्हणतात, "चित्रपटातील अशा गोष्टी केवळ सिनेमॅटिक फॅन्टसीसाठी असतात. त्या पाहून डॉक्टर होऊ नका!" त्यांनी सांगितलं की, सिनेमा म्हणजे केवळ करमणूक. वास्तवात कोणतंही वैद्यकीय उपचार अशा प्रकारे होत नाहीत.