2019 साली रानू मंडलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायक हिमेश रेशमियाने तिला हॅपी हार्डी अँड हीर या चित्रपटात गाण्याची संधी दिली. तिचा आवाज संपूर्ण देशभर गाजला. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली. तिला कमालीचं स्टारडम मिळालं. ही प्रसिद्धी टिकवून ठेवणं तिच्यासाठी खूप अवघड झालं.
( ब्लॅक मॅजिकची शिकार झाली 'विवाह' फेम अभिनेत्री, हातातून गेल्या 3 फिल्म्स, सांगितलं काय घडलं? )
advertisement
प्रसिद्धी मिळाल्यानंतर गेल्या काही वर्षांत रानू मंडलचं वागणं बदलल्याचं दिसून आलं होतं. सोशल मीडियावर तिचे चाहत्यांशी वाद घालतानाचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर राणूच्या स्वभावावर प्रचंड टीका करण्यात आली होती. तिने एका रात्रीत जे मिळवलं ते एका रात्रीच गमावलं. त्यानंतर राणू मंडल लाइमलाइटपासून दूर झाली.
आता 5 वर्षांनी युट्यूबर निशू तिवारीने राणू मंडलची कोलकत्ता येथील राणाघाट येथील घरी जाऊन भेट घेतली. तेव्हा तिची अवस्था पाहून तोही शॉक झाला. तिची अवस्था पहिल्यापेक्षा बिकट झाली आहे. युट्यूबरनं सांगितलं की, तिची अवस्था खूप भीषण आहे. घराच्या भिंतींवर किडे, सगळीकडे कचरा आणि टॉयलेटची दुर्गंधी येत होती. राणूची मानसिक अवस्था ठीक नाही. तिला काही कळत नाही, तिच्या काहीच लक्षातही नाही. ती जे बोलते ते पुढच्या पाच मिनिटांत विसरून जाते.
रानू मंडलला प्रसिद्धी मिळाली तेव्हा तिने खूप पैसे कमावले पण या काळात अनेकांना तिची फसवणूकही केली. आता ती पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे. तिला भेटायला येणारे लोक तिच्यासाठी जेवण, थोडे पैसे घेऊन येतात. एकेकाळी अमाप प्रसिद्ध मिळवणारी राणू मंडल आज जगण्यासाठी संघर्ष करतेय. तिच्या प्रसिद्धीमागचं वास्तव मन हेलावन टाकणारं आहे.