रश्मिका मंदान्नाचे नाव विजय देवरकोंडाशी दीर्घकाळापासून जोडले गेले आहे. तरी या दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. आता अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितले की ती तिच्या आयुष्यात जोडीदाराच्या शोधात आहे. ती म्हणते, 'आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला माझा जोडीदार हवा आहे. मला नात्यात आराम, सुरक्षितता हवी आहे.'
रश्मिकाच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या नात्यात दयाळूपणा आणि आदर हवा आहे. ती म्हणते, 'जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांचा पूर्ण आदर करता. जर तुम्ही एकमेकांशी दयाळू असाल तर या सर्व गोष्टी जोडल्या जातात. मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो मनाने चांगला असेल आणि जो खरोखर माझ्याबद्दल मनापासून काळजी करत असेल.'
advertisement
लहानपणीचा 'अब्दुल', लग्न करताना झाला 'जितेंद्र', तीन मुलांच्या सुपरस्टार बापाने का बदललं नाव?
रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला
विजय देवरकोंडासोबत नाव जोडण्याआधी अनेक वर्षांपूर्वी रश्मिकाच्या आयुष्यात प्रेमाचा प्रवेश झाला होता. तिचा डेब्यू चित्रपट 'किरिक पार्टी'च्या सेटवर तिची भेट को-स्टार रक्षित शेट्टीशी झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे प्रेम फुलले आणि त्यांनी साखरपुडा केला.
नातं 12 महिनेही टिकलं नाही
रक्षित शेट्टीसोबतच्या लग्नाच्या वेळी रश्मिका फक्त 21 वर्षांची होती आणि तिने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करताच साखरपुडा केला. रक्षित शेट्टी तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा होता. त्यांच्या एंगेजमेंटच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, त्यांच्या नात्याच्या अवघ्या 12 महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि त्यांनी त्यांचे नाते संपवले.
