लहानपणीचा 'अब्दुल', लग्न करताना झाला 'जितेंद्र', तीन मुलांच्या सुपरस्टार बापाने का बदललं नाव?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एक असा अभिनेता आहे ज्याची जगभरात क्रेझ आहे. पण त्याच्या चाहत्यांनाही त्याचे लहानपणीचे नाव माहित नसेल.
बॉलीवूड स्टार्सचे खरे आयुष्यही खूप रंजक असते. अनेकदा स्टार्स त्यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगतात, ज्या त्यांनी कोणालाही सांगितलेल्या नसतात. तर काहीवेळा इतर कोणीतरी आपल्याला हे किस्से सांगतात. एक असा अभिनेता आहे ज्याची जगभरात क्रेझ आहे. पण त्याच्या चाहत्यांनाही त्याचे लहानपणीचे नाव माहित नसेल. लग्नाच्या वेळीही त्यांने त्याचे नाव बदलले होते. जाणून घ्या काय आहे यामागची गोष्ट.
आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे शाहरुख खान. लहानपणी त्याची आजी त्याला शाहरुख नाही, तर दुसऱ्या नावाने हाक मारायची. गौरीसोबत लग्न करतानाही शाहरुखने स्वतःचे नाव बदलले होते.
शाहरुखचे लहानपणीचे नाव काय होते?
अनुपम खेर यांचा एक कार्यक्रम होता, ज्याचं नाव होतं ''कुछ भी हो सकता हैं''. एकदा या शोमध्ये शाहरुख खान आला होता. त्यानंतर अनुपम खेर यांनी त्याला विचारले होते की, 'किंग खान अब्दुल रहमान'ला ओळखतो का? यावर उत्तर देताना शाहरुखने त्याला हे नाव आजीने दिल्याचे सांगितले. पण अभिनेत्याला सुरुवातीपासूनच अब्दुल हे नाव आवडायचे नाही. या नावामुळे त्याची खिल्ली उडवली जायची.
advertisement
शाहरुखने याच मुलाखतीत खुलासा केला होता की त्याच्या वडिलांनी नंतर त्याचे नाव बदलून शाहरुख केले आणि सगळीकडे या नावाची नोंद केली. त्याच्या बहिणीचे नावही शाहरुखसोबत जुळते. किंग खानच्या बहिणीचे नाव शहनाज लालरुख खान होते.
शाहरुख खानने लग्नाच्या वेळी नाव का बदलले?
advertisement
मुश्ताक शेख यांनी शाहरुख खानवर पुस्तक लिहिले. या पुस्तकानुसार, लग्नाच्या वेळी शाहरुखने स्वतःचे नाव 'जितेंद्र कुमार तुल्ली' ठेवले होते. आर्य समाजाच्या लग्नासाठी शाहरुखला ओळखपत्र बदलावी लागली. शाहरुखच्या आजीला वाटले की किंग खान जितेंद्रसारखा दिसतो, म्हणून तिने हे नाव निवडले. या नावातून त्याने दोन व्यक्तींना श्रद्धांजलीही वाहिली. पहिला जितेंद्र आणि दुसरा राजेंद्र कुमार. तुल्ली हे राजेंद्र कुमार यांचे खरे आडनाव होते.
advertisement
केवळ शाहरुखच नाही तर गौरीनेही लग्नाच्या वेळी तिचे नाव बदलले होते. गौरीने तिचे नाव बदलून आयशा ठेवले. लग्न आणि निकाहनंतर दोघांनी कोर्ट मॅरेजही केले होते.
शाहरुख-गौरीचं लग्न कधी झालं?
शाहरुख आणि गौरी यांचा विवाह २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये झाला होता. लग्नाच्या वेळी शाहरुख फार मोठे नाव नव्हते. मात्र गौरीने त्याला साथ देण्याचे ठरवले. दोघांना ३ मुले असून त्यांची नावे आर्यन, सुहाना आणि अब्राहम आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2024 6:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लहानपणीचा 'अब्दुल', लग्न करताना झाला 'जितेंद्र', तीन मुलांच्या सुपरस्टार बापाने का बदललं नाव?


