advertisement

दीपिका-रणवीरच्या मुलीचा फोटो पाहून खूश होताय? ही गोष्ट कोणालाच माहित नाही, तुम्हालाही बसेल धक्का

Last Updated:

सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर बाळाला भरवताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर बाळासोबत दिसत आहेत.
सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर बाळासोबत दिसत आहेत.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या वर्षी सप्टेंबरमध्ये एका गोंडस मुलीचे पालक झाले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव दुआ पदुकोण सिंग ठेवले आहे. दीपिका आणि रणवीरने मुलीच्या नावाची घोषणा करत पोस्टमध्ये त्यांच्या मुलीची झलक दाखवली होती पण तिचा चेहरा जगापासून लपवून ठेवला होता. रणवीर आणि दीपिका अनेकदा आउटिंगला जातात तेव्हा ते आपल्या मुलीचा चेहरा लपवून ठेवतात. पण आता सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर बाळाला भरवताना दिसत आहेत. यामध्ये बाळाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.
व्हायरल झालेले फोटो पाहून चाहत्यांनी पुन्हा या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली. बेबी दुआच्या गोंडसपणाचे कौतुक करू लागले. चाहते आनंदी होऊ लागले, बाळाची एक झलक पाहण्यासाठी ते अधीर झाले होते, अखेर त्यांना ती दिसली. पण खूप आनंदी होऊ नका. ही सर्व बनावट छायाचित्रे आहेत. दीपिका किंवा रणवीर सिंग दोघांनीही हे फोटो शेअर केलेले नाहीत.
advertisement
रणवीर सिंग-दीपिका पदुकोणचा हा फॅमिली फोटो फेक आहे. हे फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिकाचे चेहरे दुसऱ्या स्त्री-पुरुषाच्या धडांशी जोडलेले आहेत. दीपिका-रणवीरच्या या फोटोंमध्ये काहीही तथ्य नाही. ते बनावट आहेत.
advertisement
अलीकडेच, बाळाच्या जन्मानंतर, दीपिका पदुकोण पहिल्यांदाच बेंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. सैल पांढरा टॉप आणि ब्लू जीन्स परिधान करून ती आनंदाने नाचताना आणि मैफिलीचा आनंद लुटताना दिसली. दीपिका दिलजीतसोबत स्टेजवर सामील झाली. तिने 'नमस्कारम बेंगळुरू' म्हणत बेंगळुरू प्रेक्षकांना अभिवादन केले आणि त्यांच्याशी कन्नडमध्ये संवाद साधला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
दीपिका-रणवीरच्या मुलीचा फोटो पाहून खूश होताय? ही गोष्ट कोणालाच माहित नाही, तुम्हालाही बसेल धक्का
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement