सलमान खानच्या आगामी चित्रपट 'सिकंदर' मधील नवीन गाणे 'सिकंदर नाचे नाचे' नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात भाईजानचा स्वॅग आणि दमदार डान्स पाहायला मिळतो. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
( 'सलमान काकाने रात्रभर मला...' दबंगमधील व्हिलनच्या लेकीकडून भाईजानचं गुपित उघड )
सलमान खानचा स्वॅग आणि जबरदस्त डान्स
advertisement
या गाण्यात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. सलमान आपल्या स्टाईलने जबरदस्त डान्स करत असून, गाण्याचे दृश्य खूप भव्य आणि आकर्षक आहे.
'सिकंदर नाचे नाचे' गाण्याला कोणी दिला आवाज?
'सिकंदर नाचे नाचे' गाण्याचे बोल समीर अंजान यांनी लिहिले आहेत. या गाण्याला अमित मिश्रा आणि आकासा यांनी आवाज दिला आहे. संगीतकार सिद्धांत मिश्रा यांनी गाण्याला संगीत दिले आहे, तर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी डान्स कोरिओग्राफी केली आहे.
'सिकंदर'च्या गाण्यांची यादी
या चित्रपटातील हे तिसरे गाणे आहे. याआधी रिलीज झालेली दोन गाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
- ‘जोहरा जबीन’ – रोमान्सने भरलेले गाणे
- ‘बम बम भोले’ – धमाकेदार होळी गाणे
- ‘सिकंदर नाचे नाचे’ – पार्टी आणि डान्स फ्लोअर गाणे
चित्रपटाचा ट्रेलर केव्हा येणार?
ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या 'सिकंदर' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगादास यांनी केले असून, त्यात सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सत्यराज यांना 'बाहुबली'मध्ये कटप्पाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.
चित्रपटाचे तीन गाणी आणि टीझर प्रदर्शित झाले असले तरी, अजूनही ट्रेलर रिलीज व्हायचा आहे. अंदाजानुसार, चित्रपटाच्या रिलीजच्या एक आठवडा आधी ट्रेलर लाँच केला जाऊ शकतो.
सलमान खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार?
सलमान खान प्रत्येक ईदला मोठा चित्रपट घेऊन येतो, आणि 'सिकंदर' देखील मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. त्याचा फॅनबेस आणि चित्रपटाची उत्सुकता पाहता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्याची शक्यता आहे.
'सिकंदर नाचे नाचे' गाण्याने सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता सर्वांना 'सिकंदर' चित्रपटाच्या ट्रेलर आणि रिलीजची प्रतीक्षा आहे. भाईजानचा हा चित्रपट ईदला किती मोठा हिट ठरेल, हे पाहणे रोमांचक ठरेल.
