TRENDING:

Raveena Tandon : रविना टंडनने दारूच्या नशेत महिलेला केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितलं त्या VIDEO मागचं सत्य

Last Updated:

रविनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओत एका व्यक्तीने रविनाने त्याच्या वृद्ध आईला धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे. आता पोलिसांनी याबाबत खरी माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन सध्या वादात सापडली आहे. रवीनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती रस्त्यावर एका कुटुंबियांशी वाद घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून रवीनावर ती दारूच्या नशेत असल्याचा देखील आरोप होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओत एका व्यक्तीने रवीनाने त्याच्या वृद्ध आईला धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे. आता पोलिसांनी याबाबत खरी माहिती दिली आहे.
रविना टंडन
रविना टंडन
advertisement

मुंबईच्या वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओत रवीनासोबत काही जण वाद घालत आहेत, तसंच तिला धक्काबुक्की देखील करत आहेत. तसंच त्या पीडिताच्या मुलाने, रिझवी लॉ कॉलेजजवळ रवीना टंडनच्या कारने त्याच्या आईला धडक दिली. या घटनेनंतर अभिनेत्री आणि तिच्या ड्रायव्हरने माफी मागण्याऐवजी पीडिता आणि त्याच्या कुटुंबीयांशी जोरदार वाद घातला अशी माहिती दिली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

advertisement

SSR : सुशांतचा मृत्यू झाला त्या घरात राहायला गेली 'ही' अभिनेत्री; तिथे जाताच आला असा अनुभव

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सर्व आरोप बिनबुडाचे असून दोन्ही पक्षांनी याविषयी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

रवीना टंडन आपल्या ड्रायव्हर सोबत आपल्या घरातून गाडीत बसून बाहेर पडत होती, तेव्हाच रस्त्यावर पायी चालत असलेल्या एक परिवार तिच्या गाडीजवळ पोहोचला. तिच्या गाडीचा परिवारातील सदस्याला धक्का लागला. त्यानंतर त्या परिवारातील सदस्यांनी रवीनाविरोधात गोंधळ करायला सुरुवात केली. याचाच व्हिडीओ बनवला गेला. रवीना आणि तिच्या ड्रायव्हरने या सदस्याला मारहाण केलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

advertisement

हा व्हिडीओ पाहून रविना दारूच्या नशेत असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी रवीनाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रवीना नशेत असल्याची टीका तिच्यावर होत आहे.मात्र या प्रकरणावर तिच्याकडून अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Raveena Tandon : रविना टंडनने दारूच्या नशेत महिलेला केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितलं त्या VIDEO मागचं सत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल