बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनपर्यंत अभिनेते महेश मांजरेकर यांची होस्टिंगची जबाबादारी सांभाळली होती. त्यानंतर पाचव्या सीझनला अचानक बिग बॉस मराठीचा होस्ट बदलण्यात आला. महेश मांजरेकर यांची जागा अभिनेता रितेश देशमुख याने घेतली. रितेशनं पाचवा सीझन उत्तमरित्या हँडल केल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉस मराठीचा सहावा सीझन कोण होस्ट करणार असा प्रश्न सगळ्यांना होता.
advertisement
बिग बॉस मराठी 6 कोण होस्ट करणार याचं उत्तर अखेर समोर आलं आहे. कलर्स मराठी वाहिनीकडून नुकताच एक प्रोमो शेअर करण्याच आला आहे. ज्यात बिग बॉस मराठी 6च्या होस्टची झलक पाहायला मिळाली. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे. कारण अभिनेता रितेश देशमुखचं बिग बॉस मराठी 6 होस्ट करणार आहे. बिग बॉस 19 मध्ये बिग बॉस मराठी 6 ची अनाऊंसमेन्ट करण्यात आली. रितेश देशमुख बिग बॉस मराठी 6चा होस्ट असणार आहे.
रितेश देशमुखनं नुकतंच बिग बॉस मराठी 6 साठी खास फोटोशूट केलं. या फोटोशूटचा BTS व्हिडीओ कलर्स मराठी वाहिनीकडून शेअर करण्यात आला आहे. रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन 6 चे होस्ट म्हणून येणार, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार... तुम्ही तयार आहात ना? असं म्हणत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
अभिनेता रितेश देशमुखने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये भाऊचा धक्का चांगलाच गाजवला होता. आता यावेळी देखील रितेश भाऊचा धक्का पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी 6 मध्ये कोणते स्पर्धक दिसणार? बिग बॉस मराठी 6 चं घर कसं असणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.
