आपल्याला आपल्या बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणीत पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे. या चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते रितेश देशमुख याने सोशल मीडियावरून हा टीझर शेअर करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
( महिला दिनी मनोरंजनाचा महासंगम! तयार रहा, 14 मालिका सलग 7 तास पाहायला )
निसर्गसौंदर्य आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा
advertisement
मापुस्कर ब्रदर्स, फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे 99' या चित्रपटात मैत्री, बालपण आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची अनोखी गोष्ट पहायला मिळणार आहे. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक दाखवण्यात आली आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेणारी मुले आणि त्यांची धम्माल पहायला मिळते. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'एप्रिल मे 99' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून हे चित्रपटाचे निर्माते असून लॉरेन्स डिसोझा हे सहनिर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणाले, “मी माझ्या पहिल्याच चित्रपटासाठी दिग्गजांचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल भाग्यवान समजतो. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले तर आता टीझर लाँच रितेश सरांच्या हस्ते झाला आहे. मी रितेश सरांसोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन्ही वेळा ते चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळते. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीझरचे लाँचिंग त्यांच्या हस्ते होणे ही आनंदाची गोष्ट आहे.” 16 मे 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “'एप्रिल मे 99' हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. खूप हलक्याफुलक्या पद्धतीने साकारलेली ही कथा प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीत नक्कीच घेऊन जाईल.”