सचिन यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते, "1963 हे वर्ष मी कधीच विसरू शकत नाही. कारण मी माझ्या ‘हा माझा मार्ग एकाला’ या पहिल्या मराठी सिनेमासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. हा पुरस्कार मला देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळणार होता. एक दिवस आधी या पुरस्कारांची तालिम केली जाते. माझीही झाली होती. पुरस्कार घ्यायचा काहीही न करता परत यायचं हे मला सांगण्यात आलं होतं."
advertisement
( स्किट लिहिणार, अभिनयही करणार; चला हवा येऊ द्यामध्ये प्रियदर्शन जाधवचा नेमका रोल काय? )
सचिन यांनी पुढे सांगितलं, "पुरस्कार वितरण सोहळ्याचा दिवस उजाडला. मी फक्त 5 वर्षांचा होतो. त्या खास दिवसासाठी माझ्या आईने माझ्यासाठी काळ्या रंगाची शेरवानी शिवून घेतली होती. तिने आणलेले खास बुटही मी घातले होते. पुरस्कारासाठी माझं नाव घेतलं तेव्हा त्यांना वाटलं की 12-13 वर्षांचा एक मुलगा येईल पण मला पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं."
https://youtube.com/shorts/iF3kF-q8EUQ?si=YX8Dev0vktYtr_hG
त्यांनी पुढे सांगितलं, "मी गेले आणि पाहिलं तिथे पंडित जवाहरलाल नेहरूही होते. मी सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन त्यांना नमस्कार केला आणि तिथून निघत होतो. तितक्यात माझ्या कानावर एक आवाज पडला. 'सुनो...' पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तो आवाज होता. मी त्यांच्याही पाया पडलो. तेव्हा त्यांनी प्रोटोकॉल मोडत मला मांडीवर बसवलं. त्यांच्या कोटावर असलेलं गुलाबाचं फुल काढलं आणि माझ्या शेरवानीवर लावलं. त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि मला म्हणाले की, जाओ..बहुत बड़े बनोगे"
"या प्रसंगानंतर मी माझ्या आईकडे गेलो. माझी रडत होती. आई तेव्हा का रडतेय हे मला समजत नव्हतं", असंही सचिन पिळगावकर यांनी सांगितलं.