स्किट लिहिणार, अभिनयही करणार; चला हवा येऊ द्यामध्ये प्रियदर्शन जाधवचा नेमका रोल काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Priyadarshan Jadhav : चला हवा येऊ द्याचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनमध्ये अभिनेता प्रियदर्शन जाधव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रियदर्शनचा नव्या सीझनमध्ये नेमका रोल काय असणार आहे?
मुंबई : चला हवा येऊ द्या या शोचा नवा सीझन येत्या 26 जुलैपासून सुरू होतोय. यावेळी निलेश साबळेच्या जागी अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. तर लेखन आणि दिग्दर्शकांची टीम देखील बदलली आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव चला हवा येऊ द्यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हवा येऊ द्याच्या प्रोमोमध्ये प्रियदर्शन अभिनय करताना दिसला होता. पण शोमध्ये त्याचा नेमका रोल काय आहे हे त्याने स्वत:च सांगितलं आहे.
प्रियदर्शनने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि "जेव्हा 'फु बाई फु' सुरु होत तेव्हापासूनच मी या टीमचा भाग होतो पण काही कारणामुळे मला तो प्रवास पुढे नेता आला नव्हता. पण जेव्हा मला 'चला हवा येऊ द्याच्या' नवीन पर्वासाठी विचारण्यात आले तेव्हा वाटलं की पुन्हा घरी परतत आहे. माझ्या करिअर मध्ये झी मराठीचा मोलाचा वाटा आहे."
advertisement
प्रियदर्शनची नेमकी भूमिका काय?
प्रियदर्शनने त्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल सांगितलं तो म्हणाला, "दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी काही स्कीट देखील लिहणार आहे आणि अभिनय सुद्धा करणार आहे. अर्थात प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असणार कारण 10 वर्ष शो ने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलंय आणि आताही प्रेक्षकांची तीच अपेक्षा असणार किंबहुना काही वेगळं ही अपेक्षित असेल ते पूर्ण करायच्या प्रयत्न आम्ही करू."
advertisement
advertisement
प्रियदर्शन पुढे म्हणाला, "या पर्वात आम्ही एकटे नसणार तर आमच्या सोबत उपभरते हास्य कलाकार असणार आहेत जे महाराष्ट्राच्या विविध भागातून या मंचावर आले आहेत. या शोचे अस्सल स्टार ते असणार आहेत. या पर्वात माझी भूमिका तिहेरी भूमिका असणार आहे. मी दिग्दर्शनही पाहणार, स्पर्धकांचे स्कीट ही बघणार आणि परफॉर्मही करणार आहे. पण हे सगळं मी एकटा करणार नसून माझ्या सोबत आणखीन काही प्रतिभाशाली लेखक आणि दिग्दर्शक असणार आहेत आणि आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत."
advertisement
प्रियदर्शनने सांगितलं, "शूटचा पहिला दिवस धमाकेदार होता. भारत, श्रेया, कुशल, गौरव सोबत मज्जा आली. मी कुशल सोबत नाटकात काम केलंय. श्रेयाने माझ्या वेब सिरीज मध्ये काम केलंय. भारत ने माझ्या नाटकात काम केलाय. गौरव सोबत काम करण्याचा योग नव्हता आला पण ती संधी या शो मुळे मिळाली."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
स्किट लिहिणार, अभिनयही करणार; चला हवा येऊ द्यामध्ये प्रियदर्शन जाधवचा नेमका रोल काय?