पहिले कारण म्हणजे चित्रपट खूप लांब होत होता, ज्यामुळे तो काढून टाकावा लागला आणि दुसरे म्हणजे, दिग्दर्शक रमेश यांना वाटले की 16-17 वर्षांच्या मुलाची हत्या दाखवणे खूप विचित्र वाटेल. त्यानंतर शेवटच्या सीनमध्ये गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी चालत आहे. जी पाहून गब्बर म्हणतो, "रामगढ का बेटा आया है," आणि नंतर तो त्या मुंगीला मारतो. यानंतर माझ्या पात्राचा मृतदेह गावात दाखवला जातो ज्यावरून असे दिसून येते की माझ्या पात्राची हत्या झाली आहे.
advertisement
( Sholay 50th Years : 300 सिनेमात केलं काम, पण या मराठी कलाकाराला 'शोले'साठी मिळाले होते 2500 रुपये )
सिनेमातून सीन काढून टाकल्यानंतर सचिन यांना फार वाईट वाटलं होतं. ते म्हणाले, "त्या वेळी मला खूप वाईट वाटलं कारण गब्बरसोबत माझा एक खास सीन होता आणि तो काढून टाकण्यात आला होता. प्रत्येक अभिनेत्याला असेच वाटेल. पण आज मी स्वतः एक दिग्दर्शक आहे तेव्हा मला वाटते की रमेशजींनी जे केले ते बरोबर होते."
शोल सिनेमात त्यांनी इमाम चाचाच्या मुलाचा रोल केला होता. अहमद असं त्यांच्या भूमिकेचं नाव होतं. अहमद नोकरीसाठी बाहेर जात असताना गब्बरचे डाकू त्याला पकडतात. त्यानंतर गब्बर त्याला ठार मारतो. अहमदचा मृतदेह घोड्यावर टाकून गावात पाठवून देतो. शोले सिनेमा केला तेव्हा सचिन पिळगावकर फक्त 17 वर्षांचे होते. त्यांचं वय लहान असल्यानं सिनेमात त्यांचे सगळे सीन दाखवण्यात आले नव्हते. शोलेमध्ये काम करण्याचं मानधनाऐवजी फ्रीज देण्यात आला होता. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये हा किस्सा सांगितला आहे. पैशांऐवजी फ्रीज मिळाल्याचा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा होता असं ते अभिमानाने सांगतात.