TRENDING:

अंग थरथरत होतं, पॅनिक अटॅक्स आले... घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची वाईट अवस्था, पहिल्यांदाच सांगितली मनातली वेदना

Last Updated:

Sania Mirza on Single Parenting : सानियाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एकटेपणा आणि पालकत्वाची जबाबदारी यावर पहिल्यांदाच इतके मोकळेपणाने भाष्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्यानंतर सानियाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एकटेपणा आणि पालकत्वाची जबाबदारी यावर पहिल्यांदाच इतके मोकळेपणाने भाष्य केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' या पॉडकास्ट शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये करण जोहरसोबत बोलताना ती खूप भावूक झाली आणि तिने सिंगल पेरेंटिंगचे भयानक सत्य सांगितले.
News18
News18
advertisement

सिंगल पेरेंटिंग खूप कठीण आणि भयानक

शोएब मलिकपासून विभक्त झाल्यानंतर सानिया मिर्झा तिचा मुलगा इझान याचे एकटीने पालनपोषण करत आहे. आपल्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिने सिंगल पॅरेंटिंगबद्दल अनेक भावनिक आणि आव्हानात्मक खुलासे केले. सानिया म्हणाली, "माझ्यासाठी सिंगल पेरेंटिंग खूप कठीण आहे, कारण आम्ही काम करत असतो आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतो." ती पुढे म्हणाली की, या जबाबदारीच्या ओझ्यामुळे तिला खूप घाबरल्यासारखे वाटते.

advertisement

Mrs. Deshpande: माधुरी दीक्षित बनली सीरिअल किलर, नव्या सीरिजमध्ये खतरनाक भूमिकेत, फर्स्ट लूक पाहून धडकी भरेल

करण जोहरने "दुसऱ्यासोबत संघर्ष करावा लागत नाही, हा दिलासा आहे" असे सांगून वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. पण सानिया म्हणाली, "वास्तविक परिस्थिती यापेक्षा खूपच कठीण आहे. माझी परिस्थिती 'क्रॉस-बॉर्डर' ची आहे, जी आणखीनच भयानक आहे."

advertisement

सानिया मिर्झा अनेकदा कामानिमित्त दुबई आणि भारत येथे प्रवास करत असते आणि यामुळे कधीकधी मुलापासून दूर राहावे लागत असल्यामुळे तिला खूप अपराधी वाटते. सानिया म्हणाली, "मला माझ्या मुलाला सोडून जाणे सर्वात मोठे आव्हान वाटते. माझ्यासाठी त्याच्यापासून एक आठवड्यासाठी दूर राहणे खूप कठीण आहे."

advertisement

Disha Vakani in TMKOC: गोकुलधाममध्ये पुन्हा एकदा 'हे माँ माताजी'! कधी परतणार 'दयाबेन'? 'टप्पू'ने दिली पक्की बातमी

तिने एकटेपणाबद्दलही प्रामाणिकपणे सांगितले. सानिया म्हणाली, "किती वेळा मी रात्रीचे जेवण टाळले आहे, कारण मला एकटीला जेवण करायचे नसते. मला वाटते यामुळेच माझे वजन कमी झाले. मी काहीतरी पाहणे आणि झोपणे पसंत करते."

advertisement

पॅनिक अटॅक आले, धावली मदतीला फराह खान

पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये सानियाची मैत्रीण फराह खान आली होती. तिने खुलासा केला होता की, घटस्फोटाच्या काळात सानियाला पॅनिक अटॅक येत होते. फराह म्हणाली, "मी खूप घाबरले होते. मी तुला कधीही पॅनिक अटॅक आलेले पाहिले नव्हते. मला त्या दिवशी शूटिंग होते, पण मी सर्व सोडून लगेच तुझ्या सेटवर आले." सानियाने त्या दिवसाबद्दल सांगितले, "तो माझ्या सर्वात वाईट दिवसांपैकी एक होता. मला त्यानंतर एका लाइव्ह शोमध्ये जायचे होते. तू तिथे नसतीस, तर मी तो शो करू शकले नसते. मी थरथर कापत होते."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम 
सर्व पहा

शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतरही सानियाने कधीही तिच्या आयुष्याबद्दल इतक्या मोकळेपणाने भाष्य केले नव्हते. मात्र, इतक्या वर्षांनंतर तिने केलेल्या या खुलाशामुळे चाहत्यांना तिला झालेल्या त्रासाचा अंदाज आला आहे. दरम्यान, आता सानिया तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली असून ती आपल्या मुलासह आनंदी जीवन जगत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अंग थरथरत होतं, पॅनिक अटॅक्स आले... घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची वाईट अवस्था, पहिल्यांदाच सांगितली मनातली वेदना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल