Mrs. Deshpande: माधुरी दीक्षित बनली सीरिअल किलर, नव्या सीरिजमध्ये खतरनाक भूमिकेत, फर्स्ट लूक पाहून धडकी भरेल

Last Updated:

Madhuri Dixit new Web series : नेहमी सौंदर्य आणि नृत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माधुरीने तिच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आता प्रेक्षकांना एक मोठा धक्का देण्यासाठी सज्ज झाली आहे. नेहमी सौंदर्य आणि नृत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माधुरीने तिच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. 'जिओ हॉटस्टार' वरील 'मिसेस देशपांडे' (Mrs Deshpande) या सिरीजचा जबरदस्त टीझर बुधवारी प्रदर्शित झाला असून, तिच्या या अवताराने चाहत्यांना शॉक दिला आहे.

सौंदर्यामागे लपलेली क्रूरता

'नटखट स्माईल आणि मोहक अदा' हीच माधुरीची ओळख आहे, पण 'मिसेस देशपांडे'च्या काही सेकंदांच्या टीझरमध्ये तिचा एक वेगळाच आणि थरारक चेहरा पाहायला मिळतोय. टीझरमध्ये माधुरी पिवळ्या रंगाच्या सुंदर वेशात, आरशासमोर बसून मेकअप आणि दागिने काढताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचे शांत आणि सुंदर हास्य अचानक एका क्रूर आणि कठोर स्मितहास्यात बदलते.
advertisement
पुढच्याच क्षणी ती तुरुंगाच्या कपड्यांमध्ये, सळ्यांमागे उभी असल्याचे दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हा बदल तिच्या भूमिकेची गूढता स्पष्ट करतो. वयाच्या ५८ व्या वर्षी पहिल्यांदाच माधुरीने करिअरमधील ही अतिशय वेगळ्या पठडीतील भूमिका स्वीकारली आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by JioHotstar (@jiohotstar)



advertisement

फ्रेंच थ्रिलरचा रिमेक

नागेश कुकनूर दिग्दर्शित ही सीरिज मुळात फ्रेंच थ्रिलर शो 'ला मांते' चा रिमेक आहे. 'ला मांते' (२०१७) ची कथा अशी आहे, 'वर्षानुवर्षे तुरुंगात असलेली एक सीरिअल किलर, तिच्यासारख्याच कॉपीकॅट हत्यांच्या मालिकेची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत करण्याची ऑफर देते. पण तिची एकच अट असते, तिचा मुलगा जो आता पोलीस अधिकारी झाला आहे, त्याने तिच्यासोबत काम करावे.'
advertisement
अप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित या सिरीजमध्ये प्रियांशु चॅटर्जी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. या सिरीजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, चाहते माधुरीला या रुपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
माधुरी दीक्षितचा शेवटचा चित्रपट 'भूल भुलैया ३' दिवाळीत हिट ठरला होता. तर, ओटीटीवर तिने २०२२ मध्ये 'द फेम गेम' या नेटफ्लिक्स सिरीजमधून पदार्पण केले होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mrs. Deshpande: माधुरी दीक्षित बनली सीरिअल किलर, नव्या सीरिजमध्ये खतरनाक भूमिकेत, फर्स्ट लूक पाहून धडकी भरेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement