'महिलांचं इन्शूरन्स...', Egg Freezing वर राम चरणच्या पत्नीचं मोठं विधान, सोशल मीडियावर राडा! असं काय बोलून गेली उपासना?

Last Updated:

Ram Charan Wife Upasana : हैदराबादच्या आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपासना यांनी महिलांच्या एग फ्रीजिंगला पाठिंबा दिला, ज्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद उफाळून आला आहे.

News18
News18
मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची पत्नी आणि अपोलो हॉस्पिटल्सच्या प्रमुख उपासना कामिनेनी कोनिडेला यांनी 'एग फ्रीजिंग' या विषयावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. हैदराबादच्या आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपासना यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एग फ्रीजिंगला पाठिंबा दिला, ज्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद उफाळून आला आहे.
'एग फ्रीजिंग' म्हणजे महिलांना त्यांच्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार भविष्यात आई होण्याचा पर्याय निवडता येतो. उपासना यांनी या प्रक्रियेवर जोर देत महिलांसाठी ते आर्थिकदृष्ट्या कसे महत्त्वाचे आहे, हे सांगितले. उपासना यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले, "महिलांसाठी सर्वात मोठा इन्शुरन्स म्हणजे त्यांचे एग्स सुरक्षित ठेवणे आहे. कारण यामुळे तुम्ही कधी लग्न करायचे, कधी तुमच्या अटींवर बाळ जन्माला घालायचे आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या कधी स्वतंत्र आहात हे ठरवू शकता."
advertisement

एग फ्रीझिंगमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम?

त्या पुढे म्हणाल्या, "आज मी माझ्या पायावर उभी आहे. मी माझ्यासाठी कमावते. मी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून नाही, याचा मला अभिमान आहे. यामुळेच आयुष्यात धाडसी निर्णय घेण्यासाठी मला आत्मविश्वास आणि शक्ती मिळाली."
advertisement
उपासना यांनी 'आयआयटी हैदराबाद'मधील अनुभवावरून कॅप्शनमध्ये महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. त्यांनी लिहिले, "मी विद्यार्थ्यांना विचारले की, 'तुमच्यापैकी किती जणांना लग्न करायचे आहे?' तेव्हा महिलांपेक्षा जास्त पुरुषांनी हात वर केले. महिला त्यांच्या करिअरवर अधिक केंद्रित दिसत होत्या. हाच नवीन, प्रगतीशील भारत आहे." त्यांनी महिलांना आपला दृष्टिकोन निश्चित करून, लक्ष्ये ठरवून स्वतःला अजेय बनवण्याचे आवाहन केले.
advertisement
advertisement

उपासना यांच्यावर टीकेची झोड

उपासना यांचे हे विधान अनेकांना रुचले नाही. त्या अपोलो हॉस्पिटल्सच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या उपाध्यक्ष असल्याने, एका युजरने त्या अपोलोच्या IVF एग फ्रीजिंग व्यवसायाची विक्री करत आहेत, अशी थेट टीका केली. एका युजरने म्हटले, "उपासनासारख्या महिलांमुळे आजकालच्या मुली योग्य वयात लग्नाचे महत्त्व समजत नाहीत. हिंदू मुली विशेषतः अशा महिलांमुळे प्रभावित होत आहेत."
advertisement
जोहो (Zoho) कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश श्रीधर वेम्बु यांनीही उपासना यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. त्यांनी X वर पोस्ट करत, "मी तरुण उद्योजकांना (पुरुष आणि महिला दोघांनाही) सल्ला देतो की, त्यांनी २० वर्षांच्या वयात लग्न करावे आणि मुले जन्माला घालावीत. त्यांनी समाज आणि त्यांच्या पूर्वजांप्रती असलेले आपले कर्तव्य पूर्ण करावे," असे सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'महिलांचं इन्शूरन्स...', Egg Freezing वर राम चरणच्या पत्नीचं मोठं विधान, सोशल मीडियावर राडा! असं काय बोलून गेली उपासना?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement