IND vs SA : साऊथ आफ्रिकेच्या विजयामागे 'लेडी लक', 'ती' संघात असल्यापासून एकही टेस्ट हारले नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
साऊथ आफ्रिकेच्या विजयामागे लेडी लक असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून ती संघात आली आहे, तेव्हापासून साऊथ आफ्रिकेने एकही टेस्ट हारली नाही आहे.
India vs South Africa : कोलकत्ताच्या ईडन गार्डनवर रंगलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा अवघ्या 30 धावांनी पराभव केला होता. या पराभवानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी साऊथ आफ्रिकेच्या विजयामागे लेडीलक असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून ती संघात आली आहे, तेव्हापासून साऊथ आफ्रिकेने एकही टेस्ट हारली नाही आहे.त्यामुळे साऊथ आफ्रिकेची 'लेडी लक' आहे तरी कोण? हे जाणून घेऊयात.
खरं तर साऊथ आफ्रिकेच्या संघात एक महिला सदस्य आहे. जी अनेक वर्षापासून संघात सक्रिय आहे. प्रॅक्टिस असो किंवा औपचारिक संघ स्पर्धा असो, प्रोटीज कॅम्पमध्ये तिची उपस्थिती नेहमीच असते.ती अनेकदा कर्णधार, प्रशिक्षक आणि सर्व खेळाडूंना सूचना देताना दिसते. संघातील सदस्य आणि सहाय्यक कर्मचारी तिच्या सूचनांचे हसतमुखाने पालन करताना दिसतात.त्यामुळे ती कोण आहे? याची उत्सुकता ताणली गेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एकमेव महिला सदस्य लुसी डेव्ही आहे, जी संघासोबत मीडिया स्पेशालिस्ट म्हणून काम करते.
advertisement
लुसीने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासोबत काम केले होते आणि गेल्या साडेतीन वर्षांपासून पुरुष संघात ती कार्यरत आहे."मी क्रिकेट खेळत नव्हते, परंतु मला या खेळात खूप रस होता. मी कम्युनिकेशन मॅनेजमेंटचा अभ्यास केला आणि नंतर टायटन्स क्रिकेटमध्ये काम केले. मी गेल्या सहा वर्षांपासून क्रिकेट साउथ आफ्रिकेशी संबंधित आहे.", असे लूसी तिच्या क्रिकेट पार्श्वभूमीबद्दल सांगते.
advertisement
"हा एक अद्भुत अनुभव होता. सर्व खेळाडू खूप चांगल्या स्वभावाचे, मैत्रीपूर्ण आणि मदत करणारे आहेत." डेव्ही हसत हसत एक मनोरंजक मुद्दा जोडते, "मी कदाचित संघाची लकी चार्म आहे. पहा, माझ्या कार्यकाळात संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले'', असे लुसी पुरूष संघासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना म्हणते. तसेच ती पुढे स्पष्ट करते की तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक क्षण म्हणजे संघ कसोटी विजेता बनला. ती म्हणाली, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, तो सामना जिंकण्याचा उत्साह दुप्पट झाला कारण माझे पालक विशेषतः अंतिम फेरीसाठी इंग्लंडला गेले होते."
advertisement
संघ चांगला खेळत नसताना लुसीला डगआउटमध्ये तणाव जाणवतो का? यावर लुसी म्हणते, "अगदी, ते स्वाभाविक आहे, परंतु मला ती परिस्थिती टाळण्याचा मार्ग सापडला आहे. त्या काळात, मी दुसऱ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करते,असे लुसी म्हणते.
दरम्यान भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याला येत्या 22 नोव्हेंबर 2025 पासून सूरूवात होणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर रंगणार आहे.या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 8:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : साऊथ आफ्रिकेच्या विजयामागे 'लेडी लक', 'ती' संघात असल्यापासून एकही टेस्ट हारले नाही


