Riteish Deshmukh: रितेश देशमुखला मोठा धक्का, आगामी चित्रपटावर सेन्सॉरची कात्री! 'ते' सीन्स काढावे लागणार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Riteish Deshmukh Movie : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आगामी चित्रपटातील विशिष्ट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली आहे.
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या एडल्ट कॉमेडीमुळे लोकप्रिय असलेली 'मस्ती' फ्रँचायझी आता चौथा भाग 'मस्ती ४' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील अनेक दृश्यांवर आणि डबल मीनिंग अश्लील डायलॉग्सवर जोरदार आक्षेप घेतला आहे. कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. 'मस्ती ४' च्या बाबतीतही असेच झाले आणि बोर्डाने अनेक दृश्यांवर 'कात्री' चालवण्याचे आदेश दिले.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील अश्लीलता जास्त असलेल्या काही दृश्यांना आणि विशिष्ट डायलॉग्सना विरोध केला. त्यानंतर निर्मात्यांनी ते बदलले. अशा प्रकारे, एकूण ३९ सेकंदांचे सीन्स आणि डायलॉग्स चित्रपटातून वगळण्यात आले आहेत. यानंतर 'मस्ती ४' ला 'ए' रेटेड सर्टिफिकेट (A/Certificate) मिळाले आहे. म्हणजे हा चित्रपट केवळ १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच आहे.
advertisement
चित्रपटाची लांबी कमी झाली
सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर, चित्रपटाची लांबी आता कमी झाली आहे. कटनंतर आता 'मस्ती ४' ची एकूण लांबी २ तास २४ मिनिटे १७ सेकंद इतकी राहिली आहे. 'मस्ती ४' चा ट्रेलर पाहिल्यावरच अनेकांना वाटले होते की, यात डबल मिनिंग डायलॉग्सची आणि अशलील दृश्यांची इतकी भरमार आहे की सेन्सॉर बोर्ड नक्कीच ॲक्शन घेईल, आणि तसेच झाले.
advertisement
'मस्ती ४' मधून तिकडी परतली!
या चित्रपटातून अभिनेता रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय यांची लोकप्रिय कॉमेडी तिकडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला येत आहे. 'मस्ती ४' चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 8:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Riteish Deshmukh: रितेश देशमुखला मोठा धक्का, आगामी चित्रपटावर सेन्सॉरची कात्री! 'ते' सीन्स काढावे लागणार


