संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा सुरू होती तेव्हा संजयचं रिचा शर्माबरोबर लग्न झालं होतं. 1993 हे वर्ष संजय दत्तसाठी सर्वात वाईट वर्ष होतं. त्या काळात त्यांच्या आयुष्यात खूप उलथापालथ होती. संजय दत्त आणि रिचा यांनी 1987मध्ये अमेरिकेत लग्न केलं. दोघांचं वैवाहिक आयुष्य व्यवस्थित सुरू असताना रिचाला कॅन्सर झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. उपचारांसाठी ती विदेशात गेली. इकडे माधुरी आणि संजय दत्त यांचे साजन, ठाणेदार आणि खलनायक सारख्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे येत होते. कामासाठी त्याला रिचाला सोडून भारतात यावं लागलं.
advertisement
( 308 अफेअर्स, 3 लग्न आणि… 66 वर्षीय संजय दत्तला एकूण किती मुलं? एक मुलगी तर 37 वर्षांची )
या काळात संजय खूप तणावात होता. अशा परिस्थितीत चित्रपटात काम करताना त्याला माधुरी दीक्षितची साथ मिळाली. त्यांच्या जवळीकतेबद्दल बरीच चर्चा झाली. त्या काळातील मॅगझिन संजय आणि माधुरीच्या कथित अफेअरच्या बातम्यांनी भरलेली होती. याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत होता. असे म्हटले जाते की जेव्हा संजय दत्तची पत्नी रिचा शर्मा हिला त्यांच्या अफेअरबद्दल कळले तेव्हा ती तिचा संसार वाचवण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत परतली. असं म्हणतात की, कॅन्सरग्रस्त रिचा मुंबईत आली पण दुःखाची गोष्ट म्हणजे जेव्हा रिचा मुंबईत आली तेव्हा संजय दत्तने तिला महत्त्व दिले नाही. इतकेच नाही तर तो त्याची आजारी पत्नी आणि मुलगी त्रिशालाला घेण्यासाठी एअरपोर्टवरही गेला नाही.
त्या काळात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकत्र 'साजन' चित्रपटात काम करत होते. शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढू लागली. त्यामुळे संजय आणि पत्नी रिचा शर्मा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि वाद वाढले. त्यानंतर दोघे वेगळे झाले.
संजय दत्तची वहिनी आणि रिचा शर्माची बहीण अना शर्मा यांनी 1992 मध्ये 'सिनेब्लिट्झ'ला दिलेल्या मुलाखतीत मोठा आरोप केला होता. ती म्हणाली होती, "माधुरीमध्ये माणुसकी नाही. ती कोणत्याही पुरुषाला मिळवू शकते. आपल्या पत्नीशी वाईट वागणाऱ्या पुरुषासोबत ती कशी राहू शकते? माधुरीमुळेच तिच्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला. आम्हाला माहीत होतं की, संजय आणि माधुरी चांगले मित्र आहेत. संजयने माधुरीला आमच्या घरीही आणलं होतं. तो तिच्या कुटुंबीयांशीही बोलायचा. पण त्यांच्यात रिलेशनशिप असेल असं आम्ही कधीच गृहित धरलं नव्हतं. आम्ही नेहमीच संजयला त्याची स्पेस दिली होती."
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात जेव्हा संजय दत्त बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती तेव्हा आणि किंबहुना त्याआधीच माधुरीने संजयला स्वत: पासून दूर केलं होतं. संजय दत्तने मात्र माधुरीसोबतच्या प्रेमसंबंधाला नकार दिला होता. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, "आमच्यात काही असलं तरच मी माधुरीशी लग्न करू शकेन. माझा तिच्यासोबत सीन असावा अशी इच्छा होती एवढंच."
त्या काळात अशी चर्चा होती की संजय माधुरीशी लग्न करणार आणि रिचा शर्मा हिला घटस्फोट देणार. मात्र रिचा शर्माने हे फेटाळलं होतं. एका मुलाखतीत रिचा म्हणाली होती की, "संजय मला कधीच घटस्फोट देणार नाही. मी त्याला थेट विचारलं होतं." त्यावर संजय म्हणाला की, "तो फक्त माझीच काळजी करतो, इतर कुणाचीही नाही."