Sara Khan Krrish Pathak Wedding : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेता कृष पाठकसोबत सारा खानने कोर्ट मॅरेज केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नव्या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे साराचा पती कृष हा रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांचा मुलगा आहे. सारा आणि कृषच्या पोस्टवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सारा आणि कृषने एकत्र एका म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.
advertisement
सारा-कृषचं कोर्ट मॅरेज
बॉलिवूड सेलिब्रिटी शाही थाटात लग्न करायली पसंती दर्शवतात. पण सारा आणि कृष यांनी मात्र कोर्ट मॅरेज करायला पसंती दर्शवली आहे. सारा आणि कृष यांनी आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटो शेअर करत जोडप्याने खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे,"दोघांचा एकमेकांवरील विश्वास, एक गोष्ट आणि खूप सारं प्रेम. विश्वास आणि प्रेमाच्या जोरावर आमचं नातं बळकट होत गेलंय. कुबूल है म्हणत सात फेरेपर्यंत या डिसेंबरमध्ये दोन मनं आणि दोन संस्कृती एक होण्यासाठी सज्ज आहेत. जेव्हा प्रेम सर्वोच्च ठिकाणी असतं तेव्हा सर्व गोष्टी सुंदरच वाटत असतात. तुमचा आशीर्वाद हवाय. कारण हे नातं फक्त आमचं नसून आपलं सर्वांचं आहे".
5 एपिसोडची खतरनाक हॉरर सीरिज, एकट्याने अजिबात पाहू नका; रात्री वॉशरुमलाही जायचे होतील वांदे
सारा-कृष्णाचे फोटो व्हायरल
सारा आणि कृष्ण आपल्या लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच गोड दिसत आहेत. जोडप्याने चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ते मॅरेज डॉक्यूमेंटवर सही करताना दिसत आहेत. बाकी तीन फोटोंमध्ये सारा आणि कृष रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. साराने गडद निळ्या रंगाचा छान ड्रेस घातलाय. तर कृषने क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
Photo : ssarakhan
साराचं पहिलं लग्न कोणासोबत झालेलं?
साराचं पहिलं लग्न अली मर्चेंटसोबत झालं होतं. एक वर्षही त्यांचं लग्न टिकलं नाही. 2011 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता कृषसोबत साराने दुसरं लग्न केलं आहे. कृष हादेखील अभिनेता आहे. 'बंदी युद्ध के' या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'हे' सेलिब्रिटी जोडपंही अडकलं लग्नबंधनात
'दिया और बाती हम' फेम अभिनेता एलन कपूर आणि अभिनेत्री रविरा भारद्वाज यांनीदेखील लग्न केलं आहे. समुद्रकिनारी डेस्टिनेशन वेडिंग त्यांनी केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.