काय म्हणाली सारा खान?
सारा व्हिडीओमध्ये म्हणतेय,"कृष्ण आणि मी वेगवेगळ्या संस्कृतीतले आहोत. आमच्या दोन्ही धर्मांनी आम्हाला प्रेम करायला शिकवलं आहे. आमच्या कुटुंबियांनी सर्वात आधी आम्हाला दुसऱ्याचा सन्मान, आदर करायला शिकवलं आहे. कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं आहे. सकारात्मक विचार करणाऱ्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मला आभार मानायचे आहेत".
advertisement
सारा अडकली लग्नबंधनात, 'रामायण'मधील लक्ष्मणच्या मुलासोबत थाटला संसार, PHOTO
कोणताच धर्म दुसऱ्या धर्माचा अनादर करा शिकवत नाही : सारा खान
सारा पुढे म्हणतेय,"कोणताच धर्म तुम्हाला कोणत्या दुसऱ्या धर्माचा अनादर करा, असं शिकवत नाही याची नोंद घ्या. आमच्या शुभचिंतकांसाठी आम्ही लग्न केल्याचं जाहीर केलं. लग्नासाठी आम्हाला कोणाची परवानगी नको होती. कारण आम्हाला आमच्या कुटुंबाचा आधीपासूनच पाठिंबा होता. माझं माझ्यादेवासोबत काय नातं आहे हे मला माहिती आहे. याबद्दल बोलण्याचा, टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही. कोणताच धर्म तुम्हाला चुकीच्या पद्धतीने इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करा असं सांगत नाही.
सारा खानने या व्हिडीओमध्ये असेही म्हटले आहे की ती कृषसोबत दुसऱ्या धर्माचा सन्मान करत निकाह आणि पारंपारिक पद्धतीने सात फेरे घेत लग्न करेल. विशेष म्हणजे साराने या पोस्टसोबत 'रब ने बना दी जोडी' हे गाणं वापरलं आहे. सारा खान आणि कृष पाठक यांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं होतं.
डिसेंबरमध्ये घेणार सात फेरे
साराने व्हिडीओच्या शेवटी डिसेंबरमध्ये निकाह आणि सात फेरे घेणार असल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओ शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"सर्वांचे आभार आणि ,तुम्हा सर्वांना प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम". चाहत्यांना आता सारा आणि कृषच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.