जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटी, पण शॉकिंग पोस्ट केली होती, जी तिने काही वेळातच डिलीट केली. मात्र, तोपर्यंत ही पोस्ट व्हायरल झाली होती आणि आता याच पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. या स्टोरीमध्ये जान्हवीने लिहिले होते, "सेव्ह द डेट २९ ऑक्टोबर." यासोबत तिने हार्ट इमोजी, डान्स करणाऱ्या मुलीचा इमोजी आणि विमानाची इमोजी शेअर केली होती. ही पोस्ट डिलीट झाली असली तरी, या तिन्ही गोष्टींचा मेळ लावत चाहत्यांनी आता अनेक तर्क काढायला सुरुवात केली आहे.
advertisement
लग्नाची घोषणा की नवीन सिनेमा?
जान्हवीने केवळ २९ ऑक्टोबरचा उल्लेख आणि 'हार्ट इमोजी' वापरल्यामुळे अनेक चाहत्यांनी थेट हा शिखर पहाडियासोबतच्या तिच्या लग्नाचा संकेत असल्याचा कयास लावला आहे. तर, दुसरीकडे काही चाहत्यांनी याला तिच्या करिअरशी जोडले आहे. 'डान्सिंग गर्ल' आणि 'फ्लाईट'चा उल्लेख असल्यामुळे ही तिच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेची तारीख असू शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. चाहते अंदाज लावत आहेत की, जान्हवी 'चालबाज इन लंडन' या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा याच दिवशी करू शकते.
जान्हवी कपूरने यापूर्वी लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी, 'ती तारीख' आणि सोबतचे इमोजी यामुळे नक्की काय होणार, याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रोमँटिक-कॉमेडीमध्ये जान्हवीची धमाल
जान्हवी कपूर नुकतीच 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटात दिसली होती. त्यापूर्वी ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'परम सुंदरी' मध्ये दिसली होती. हे दोन्ही चित्रपट रोमँटिक-कॉमेडी असूनही बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. आता २९ ऑक्टोबरला जान्हवी कोणती मोठी बातमी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
