प्रियाचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. कॅन्सरशी झुंज देत वयाच्या फक्त 38 व्या वर्षी ती जगाचा निरोप घेऊन गेली. या घटनेनं संपूर्ण मराठी-हिंदी मालिकांच्या जगतात शोककळा पसरली. पण, प्रियाच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट न लिहिल्यामुळे शिवानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावर आता तिने मन मोकळं केलं. ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत शिवानी याविषयी व्यक्त झाली.
advertisement
7 भाषांमध्ये केले 70 हून अधिक सिनेमे, मल्टिटॅलेंटेड अतुल कुलकर्णीविषयी या गोष्टी माहितीय का?
शिवानी म्हणाली, “प्रियाचं जाणं मी मान्यच करू शकले नाही. तिचा फोटो शेअर करून काहीतरी लिहायचं मनात होतं, पण धाडस होत नव्हतं. दोन दिवस मी काहीच बोलू शकले नाही. आम्ही शेवटच्या मालिकेत एकत्र होतो. रोज मेकअप रूम शेअर केली होती. त्यामुळे तिचं जाणं स्वीकारणं फार कठीण आहे. काही माणसं कायम आपल्यासोबत राहतील असं वाटतं, प्रिया त्यापैकीच होती.”
शिवानीने आणखी सांगितलं की शेवटच्या काळात प्रियाला खूप त्रास होत होता. “तिच्या वेदना पाहवत नव्हत्या. देवाने तिला त्या यातनांमधून मुक्त केलं, ते बरं झालं. प्रियाला एवढ्या यातना सहन कराव्या लागू नयेत, असं वाटत होतं. पण आज ती जिथे कुठे असेल, तिथे सुखी असेल. कधी कधी देव चांगल्या माणसांसोबत खूप वाईट गोष्टी करतो”.”
प्रियाने ‘या सुखांनो या’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले आणि पुढे ‘चार दिवस सासूचे’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला. तिचं साधं-सरळ वागणं, हसतमुख स्वभाव आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची ताकद तिला वेगळी बनवत होती.