'शिवरायांचा छावा', 'मनमौज', 'घे डबल', 'ओळख', 'बर्नी' सारख्या मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता भूषण पाटील यानं अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यावर होत असलेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. त्याने ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय.
advertisement
भूषणने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "आजकाल एक नवीन ट्रेंड चाललाय मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचा. हल्लीच सचिन पिळगांवकर सरांच्या मुलाखतींचे काही कमेंट्स किंवा त्याच्या आधी संतोष जुवेकरवर खूप ट्रोलिंग केलं गेलं. आणि आणखीन इतर कलाकार. मला माहित नाहीये हे कोण करतंय, हे जाणून बुजून केलं जातंय. पण मला ह्या ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत सांगायचंय. तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते ना तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय. त्यामुळे इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. तुमच्या भल्याचं सांगतोय."
"स्वतःच्या भाषेचा आणी कलाकारांचा आदर करायला शिका", असं कॅप्शन देत भूषणने हा व्हिडीओ शेअर केला आहे. भूषणने शेअर केलेल्या व्हिडीओवर आणि त्याच्या वक्तव्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. गायक अवधूत गुप्ते यानं कमेंट करत, "खूप योग्य.. खूप छान भूषण", असं लिहिलं आहे. सोबत हार्ट इमोजी देखील शेअर केलेत.
अभिनेता भूषण याचा शिवरायांचा छावा हा सिनेमा काही महिन्यांआधी रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या अभिनयाचं देखील कौतुक करण्यात आलं. थिएटरमधील प्रेक्षकांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.