'तावडीत सापडला तर त्याला मी सोडणार नाही...', मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी देणाऱ्याला रेशम टिपणीसचा इशारा

Last Updated:

Resham Tipnis Son Death Rumour : मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीसने संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याला कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

News18
News18
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्या मुलाने 57व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली अशी खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही बातमी कळल्यानंतर रेशम टिपणीसने पोस्ट लिहून हे खोटं असल्याचं सांगितलं. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील तिने दिला. त्यानंतर आता रेशम टिपणीसने व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.
रेशमने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने म्हटलंय, "मला हा व्हिडीओ पोस्ट करायचा नव्हता पण मला खूप फोन आहेत त्यामुळे मी हा व्हिडीओ शूट करतेय. काल एक न्यूज आलेली माझ्या मुलाबद्दल. इन्स्टा आयडी आहे लाफिंग कलर्स म्हणून. त्याच्यावर त्या मूर्ख माणसाने पोस्ट केलेलं की माझ्या मुलाने 57 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या विचित्र लोकांना हे सगळं करण्याची परवानगी कोण देतं हे मला माहिती नाही. लाफिंग कलर्स म्हणून तुम्ही अकाऊंट बनवलंय आणि त्यावर तुम्ही लोकांच्या फेक बातम्या पसरवता, सोशल मीडियावर काही जोक करता. पण हा जोक नाहीये. तुम्ही एखाद्याच्या इमोशन्सशी खेळताय. विचार करा एका आईवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. मला जेव्हा फोन आला तेव्हा मी थरथरले. पण अर्धा तास आधीच मी त्याच्याशी बोलले होते. मला माहिती होतं पण तरीही मी त्याला फोन केला की तू कुठे आहे. तो कामावर होतो."
advertisement
रेशम पुढे म्हणाली, "मी सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल करण्याचा विचार करतेय. तुमची ओळख कोणाकडे असेल तर प्लिज यावर कठोर कारवाई करण्यासाठी मदत करा. कारण आता झालंय असं की असंही सोशल मीडियावरून लोकांना विश्वास उडाला आहे. पण जे लोक खरी काम करत आहेत त्यांच्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे हे सगळं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या लोकांना थांबवलं पाहिजे आणि शिक्षा द्यायला पाहिजे."
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by HUNCH (@hunchmediaofficial)



advertisement
"मला राग नाही आला त्या माणसाचा कारण मला त्या इडियट माणसाच्या मागे माझी शक्ती घालवायची नाहीये. तो गाढव आहे. पण माझ्या तावडीत जर तो सापडला तर मी नक्कीच त्याला सोडणार नाही", असं म्हणत रेशमने संताप व्यक्त केला.
रेशम शेवटी म्हणाली, "ही न्यूज फेक आहे. मानव व्यवस्थित आहे. बाप्पाच्या कृपेनं तो हेल्दी आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टीवर अँक्शन घेतली पाहिजे. कारण त्यांना कोणाच्याही भावनांची खेळण्याचा अधिकार नाहीये."
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तावडीत सापडला तर त्याला मी सोडणार नाही...', मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी देणाऱ्याला रेशम टिपणीसचा इशारा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement