पनवेल- बोरिवली- वसई कॉरिडोअरसाठी डिसेंबर 2027 उजाडणार, कारण...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पनवेल- बोरिवली- वसई मार्गावरील विस्तारीकरणासाठी आणखीन वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण, हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवली स्थानकापर्यंत विस्तारीकरण करण्याचे काम आता भूसंपादनाच्या कामामुळे खोळंबले आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगर शहरांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी एक महत्वाची बातमी आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी आहे. सध्या हार्बर मार्गावरून पश्चिम मार्गावरील गोरेगावपर्यंत लोकल धावत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गाची थेट जोडणी हार्बर रेल्वेशी करण्यात येणार असल्याची काही दिवसांपूर्वी बातमी आली. परंतु, ह्या मार्गाला आता आणखीन उशीर लागणार आहे. गोरेगावपासून पुढे हिच मार्गिका बोरीवलीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने कामदेखील सुरू केले आहे. मात्र हार्बर मार्गाचे बोरीवलीपर्यंतचे विस्तारीकरण रखडले आहे. काम पूर्ण होण्यात आणखी अडीच वर्षे लागणार आहे.
अलीकडेच, पनवेल- बोरिवली- वसई मार्गावरील विस्तारीकरणासाठी आणखीन वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण, हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवली स्थानकापर्यंत विस्तारीकरण करण्याचे काम आता भूसंपादनाच्या कामामुळे खोळंबले आहे. अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी आवश्यक असलेल्या कांदिवलीतील जागेच्या संपादनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यामुळे हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार होण्यासाठी डिसेंबर 2027 उजाडण्याची शक्यता आहे. रेल्वेने ही डेडलाइन डोळ्यापुढे ठेवली असली तरी कामाला आणखी विलंब होऊ शकतो, असे मत रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यान रेल्वेच्या मार्गिकांसाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सध्याचे विस्तारीकरणाचे काम मालाडपर्यंत पूर्ण झाले आहे. कांदिवली पूर्वेकडील जागा संपादित करण्याचा मोठा प्रश्न असल्याचे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले. प्रकल्प बाधितांशी यशस्वी चर्चा झाल्यानंतरच प्रत्यक्ष काम मार्गी लागेल, असे अधिकार्यांनी सांगितले आहे. हार्बर मार्गाचा थेट बोरीवलीपर्यंत विस्तार झाल्यास पश्चिम रेल्वेवरील गर्दीचा ताण हलका होईल. कारण पश्चिम रेल्वेवरुन सीएसएमटी आणि पनवेल येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे.
advertisement
सीएसएमटी किंवा पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांना गोरेगाववरून ट्रेन पकडावी लागते. जर बोरिवलीपर्यंत हा विस्तार झालाच तर नागरिकांचा प्रवास हा सुकर होणार आहे. गोरेगाव- बोरिवली मार्ग 7 किमी इतका आहे. हार्बर रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिका आणि स्थानकांच्या कामांसाठी गोरेगाव- बोरीवलीपर्यंत 825 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. गोरेगाव- मालाडदरम्यानचा पहिला टप्पा 2 किमीचा आहे, तर मालाड ते बोरीवलीपर्यंत 5 किमीचा दुसरा टप्पा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 8:46 PM IST