'...तर MCG वर कपडे काढून फिरेन', मॅथ्यू हेडनचं घाणेरडं वक्तव्य, ऐकून मुलीची मान शरमेने खाली गेली

Last Updated:

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, त्यामुळे मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन हिची मान शरमेने खाली गेली आहे.

'...तर MCG वर कपडे काढून फिरेन', मॅथ्यू हेडनचं घाणेरडं वक्तव्य, ऐकून मुलीची मान शरमेने खाली गेली'...तर MCG वर कपडे काढून फिरेन', मॅथ्यू हेडनचं घाणेरडं वक्तव्य, ऐकून मुलीची मान शरमेने खाली गेली
'...तर MCG वर कपडे काढून फिरेन', मॅथ्यू हेडनचं घाणेरडं वक्तव्य, ऐकून मुलीची मान शरमेने खाली गेली'...तर MCG वर कपडे काढून फिरेन', मॅथ्यू हेडनचं घाणेरडं वक्तव्य, ऐकून मुलीची मान शरमेने खाली गेली
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, त्यामुळे मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन हिची मान शरमेने खाली गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस सीरिजला सुरूवात होत आहे, या सीरिजआधी मॅथ्यू हेडनने वादग्रस्त दावा केला आहे. जो रूटने ऑस्ट्रेलियामध्ये शतक केलं नाही तर मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कपडे काढून फिरेन, असं हेडन म्हणाला आहे. इंग्लंडसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये बरीच शतकं झळकावणाऱ्या जो रूटला ऑस्ट्रेलियन भूमीवर एकही शतक करता आलेलं नाही.
हेडनने 'ऑल ओव्हर बार द क्रिकेट' या क्रिकेट शोच्या यूट्यूब चॅनलवर हे विधान केले. यावेळी रूट ऑस्ट्रेलियन भूमीवर त्याची 'शतकाची भूक' नक्कीच भागवेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. अॅशेस सीरिज 21 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होईल आणि यावेळीही पाच कसोटी सामने खेळले जातील. हेडनचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची मुलगी आणि क्रिकेट प्रेझेंटर ग्रेस हेडनने यावर प्रतिक्रिया दिली. 'रूट कृपया शतक कर, नाहीतर वडिलांची ही प्रतिज्ञा आम्हाला लाजवेल', असं ग्रेस हेडन म्हणाली आहे.
advertisement

जो रूटचं ऑस्ट्रेलियात शतक नाही

34 वर्षीय जो रूट टेस्ट क्रिकेटमधील महान बॅटरपैकी एक म्हणून गणला जातो. जो रूट हा इंग्लंडकडून सर्वाधिक टेस्ट शतकं करणारा खेळाडू आहे. 134 टेस्टमध्ये त्याने 51.29 च्या सरासरीने 13,543 रन केल्या आहेत, ज्यामध्ये 39 शतकांचा समावेश आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये जो रूटने आतापर्यंत 14 टेस्ट खेळल्या आहेत, ज्यात त्याला एकही शतक करता आलेलं नाही. ऑस्ट्रेलियामध्ये रूटच्या नावावर 9 अर्धशतकांच्या मदतीने 892 रन आहे.
advertisement
2021 पासून जो रूटच्या बॅटिंगचा आलेख चढता राहिला आहे. मागच्या 4 वर्षांमध्ये जो रूटने 61 टेस्ट मॅच खेळून 22 शतक ठोकून 5,700 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. जो रूटचं हे रेकॉर्ड पाहून मॅथ्यू हेडनला तो ऑस्ट्रेलियामध्ये शतक करेल, असा विश्वास आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'...तर MCG वर कपडे काढून फिरेन', मॅथ्यू हेडनचं घाणेरडं वक्तव्य, ऐकून मुलीची मान शरमेने खाली गेली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement