श्वेता तिवारीच्या एक्स नवरा राजा चौधरीने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले. राजा चौधरी म्हणतो की, श्वेता तिवारीने तिचा दुसरा पती अभिनव कोहली याला सुरुवातीला “भाऊ” म्हटले होते. त्यानंतर त्यांचं प्रेमसंबंध आणि नंतर लग्न झालं. राजा म्हणतो, “तो तिचा भाऊ होता. ती अनेकांना भाऊ म्हणायची. नंतर तो नवरा झाला. ही फारच विचित्र गोष्ट होती.”
advertisement
'मला लुकडी, आजारी म्हणणाऱ्यांनो, आधी हे करून दाखवा', समांथा प्रभू संतापली
यापेक्षाही अधिक धक्कादायक दावा म्हणजे राजा चौधरीचा असा आरोप की श्वेताने दुसऱ्या लग्नानंतरही एका तिसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू केलं. त्यावेळी अभिनव कोहली याने स्वतः राजा चौधरीकडे जाऊन आपली व्यथा सांगितली होती. राजा म्हणतो, “तो (अभिनव) रडत माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तुझ्या घटस्फोटाच्या काळात मी श्वेताच्या आयुष्यात आलो. आता माझ्यासोबतही तेच घडतंय.’”
श्वेताला पहिल्या लग्नातून पलक तिवारी ही मुलगी आहे, जी सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या लग्नातून तिला एक मुलगा आहे. या मुलाच्या ताब्यावरून श्वेता आणि अभिनवमध्ये अजूनही वाद सुरू आहे. अभिनवचा आरोप आहे की श्वेता त्याला मुलाला भेटू देत नाही, तर राजाचा दावा आहे की त्याला मुलीपासून दूर ठेवलं जातं.
