भिनेत्री सिमी गरेवालने सोशल मीडियावर एक अनोखी पोस्ट टाकून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. तिने रावणाचे कौतुक करणारी एक लांबलचक पोस्ट लिहिली.या पोस्टवरून तिला नंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.
अभिनेत्रीच्या पोस्टमध्ये काय ?
अभिनेत्री सिमी गरेवालने सोशल मीडियावर दसऱ्याच्या शुभेच्छा देताना म्हटले की,''प्रिय रावण... दरवर्षी, या दिवशी, आपण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. जरी तांत्रिकदृष्ट्या, तुमचे वर्तन वाईटापेक्षा थोडे खोडकर मानले पाहिजे. तुम्ही नेमके काय केले? मी सहमत आहे की तुम्ही घाईघाईत एका महिलेचे अपहरण केले, परंतु त्यानंतर, तुम्ही आजच्या जगात महिलांपेक्षा जास्त आदराने तिच्याशी वागलात. तुम्ही तिला चांगले अन्न दिले, आश्रय दिला आणि तिला एक महिला सुरक्षा रक्षक देखील दिली''.
advertisement
सिमी गरेवालने पुढे लिहिले, ''तुमचा लग्नाचा प्रस्ताव नम्रतेने भरलेला होता आणि नाकारल्यावर तुम्ही कधीही अॅसिड फेकले नाही.भगवान रामांनी तुम्हाला मारले तेव्हाही तुम्ही त्यांची माफी मागितली. तुम्ही खूप हुशार होता. मला वाटते की तुम्ही आमच्या संसदेच्या अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षित होता. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला जाळू इच्छित नसतो. अगदी तसेच. दसऱ्याच्या शुभेच्छा."
दरम्यान सिमी गरेवालची ही पोस्ट व्हायरल होताच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सोशल मीडिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर टीका केली. दरम्यान या पोस्टवरून वाद पेटताच अभिनेत्रीने ती डिलीट केली आहे.
कोणत्या सिनेमात झळकली आहे?
सिमी ग्रेवाल अजूनही 1970 मध्ये आलेल्या राज कपूरच्या 'मेरा नाम जोकर' चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. त्यानंतरही सिमीने चित्रपटांमध्ये काम करणे सुरू ठेवले. ती "अंदाज," "नमक हराम," "चलते चलते," "कभी कभी," "द बर्निंग ट्रेन," "कर्ज," "नसीब," "बीवी ओ बीवी," "लव्ह अँड गॉड," आणि "रुखसत" या चित्रपटांमध्ये दिसली. यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. तिने चित्रपटांपासून स्वतःला दूर केले आणि सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली.