अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका, झेंडू आणि लींबूला दसऱ्याला काय मिळाला भाव? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
मुंबई: बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. विजयादशमीच्या निमित्ताने आपण महत्त्वाच्या चार शेतमालांचे कृषी मार्केट जाणून घेऊ. यामध्ये झेंडू, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लिंबूच्या आवक आणि भाव पाहू.
झेंडूस असा भाव
विजयादशमीनिमित्त भुसावळ आणि जळगाव मार्केटमध्ये सर्वाधिक 24 क्विंटल झेंडूची आवक झाली. त्यास 5000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर आणि राहता मार्केटमध्ये प्रत्येकी 15 क्विंटल झेंडूची आवक झाली. अहिल्यानगर आणि राहत्या मार्केटने झेंडू सहा हजार रुपये प्रति क्विंटल उच्चांकी भाव दिला.
advertisement
पुणे जिल्ह्यात 24850 नग कोथिंबिरीची सर्वाधिक आवक झाली. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आलेल्या 1800 नग कोथिंबीरीस उच्चांकी प्रतिनग 30 रुपये प्रमाणे भाव मिळाला. तर अहिल्यानगर मार्केटमध्ये 700 नग कोथिंबीरची आवक झाली. त्यास सात रुपयांप्रमाणे भाव मिळाला.
लिंबू-कढीपत्त्याची आवक
सोलापूर बाजार समितीमध्ये आवक झालेल्या 7500 नग लिंबूस प्रति नग दोन रुपये प्रमाणे भाव मिळाला. पुणे मार्केटमध्ये लिंबूची सर्वाधिक 88 क्विंटल आवक झाली यास तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये दहा क्विंटल लिंबूची आवक होऊन दोन हजार रुपये प्रमाणे भाव मिळाला.
advertisement
पुणे मार्केटमध्ये 24 क्विंटल कढीपत्त्याची आवक होऊन प्रतिक्विंटल तीन हजार पाचशे रुपये प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये 500 नग कढीपत्त्याची आवक होऊन प्रतिनग दहा रुपये प्रमाणे बाजार भाव मिळाला. राज्यात झालेला अतिवृष्टी आणि महापुराचा फटका शेतीमालांना बसला असून यामुळे बाजारातील शेतमालांवर परिणाम दिसतोय.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
October 02, 2025 9:36 PM IST