Solapur Flood : पत्र्याचा शेड, दोन गाई गेल्या वाहून, सीनाच्या पुरात उषा यांचे 2 लाख नुकसान, Video

Last Updated:

उषा बनसोडे यांनी कष्टाने उभे केलेले घर, दोन गाई आणि शेळ्या या महापुरामध्ये वाहून गेल्या आहेत. विदारक अवस्था पाहून उषा बनसोडे यांचे अश्रू अनावर झाले आहेत.

+
News18

News18

सोलापूर : - सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे राहणाऱ्या उषा बनसोडे यांनी कष्टाने उभे केलेले घर, दोन गाई आणि शेळ्या या महापुरामध्ये वाहून गेल्या आहेत. सीना नदीला आजतागायत इतके पाणी बघितले नसल्याचे उषा बनसोडे यांनी सांगितले. विदारक अवस्था पाहून उषा बनसोडे यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
मोहोळ तालुक्यातील कोळेगावात राहणारे उषा बनसोडे हे गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहत आहेत. पण सीना नदीला कधीही इतके पाणी बघितले नव्हते. नदीला महापूर आल्याने उषा बनसोडे यांनी बांधलेले पत्र्याचे शेड, घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, टीव्ही, कूलर, दोन गाई, शेळ्या, कोंबड्या आणि जनावरांचा वैरण पाण्यात वाहून गेला आहे. जनावरांना वेळेवर वैरण मिळत नसल्याने चार दिवसांपासून बनसोडे यांचा मुलगा वैरणासाठी भटकंती करत आहे. अचानक नदीला पाणी वाढल्याने घरातील कोणतेही साहित्य उषा बनसोडे यांना काढता आले नाही. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान उषा बनसोडे यांचे झाले आहे.
advertisement
पतीचे निधन झाल्यानंतर उषा बनसोडे यांनी स्वतः दुसऱ्याच्या शेतात राहून दोन गाई, शेळ्या विकत घेतल्या होत्या. पोटच्या लेकरासारखे सांभाळलेली जनावरे डोळ्यादेखत वाहून गेली. सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावांना तसेच शेतीला मोठा फटका बसला आहे. तर कित्येक नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेले आहे. आम्हाला जरी जेवायला मिळाले नाही तरी चालेल पण प्रशासनाने जनावरांना वैरणाची सोय लवकरात लवकर करावी, अशी मागणी उषा बनसोडे यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/सोलापूर/
Solapur Flood : पत्र्याचा शेड, दोन गाई गेल्या वाहून, सीनाच्या पुरात उषा यांचे 2 लाख नुकसान, Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement