फोटोग्राफरला अजून काय दिसणार? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, भाषणातील संपूर्ण मुद्दे
- Published by:Sachin S
Last Updated:
विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात पण आतले सामान दिसत नाही. तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा घेवून गेला का?
मुंबई : "मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. आम्ही तिथे मदतीला पोहोचलो. पण मला या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात पण आतले सामान दिसत नाही. तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा घेवून गेला का? आमचे फोटो दिसले, जेव्हा तुमचे फोटो लावून आम्ही लोकांना मदत करत होतो तेव्हा नाही काही बोलले. फोटोग्राफरला अजून काय दिसणार फोटोच दिसणार ना? असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसंच, 'काही लोकं हात हलवत गेले आणि टीका करुन तोंड वाजवत आले. यांचे दौरे म्हणजे खुर्ची पाहिजेय, काजू. बदाम, पाणी मे उतरे तो सर्दी होती है' असा टोलाही शिंदेंनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणातील मुद्दे
- शिवसेनेचा दसरा मेळावा आपण परंपरेनुसार साजरा करतोय
- पण यावेळेचा दसरा मेळावा फक्त मुंबई आणि ठाण्याचा घ्यायचे ठरवले
- कारण पुरा मुळे शेतकरी हवालदिल झालाय
- त्यांना मदत करुन दसरा मेळावा साजरा करा
- शेतक-यांची मदत करा
- आज बळीराजा संकटात आहे
- त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत
advertisement
- शेती पशू धन घर वाहून गेलय
- मी डोळ्यांनी पाहिजे त्यांचे दुःख
- अशावेळेस त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे
- कारण. बाबासाहेबांनी सांगलीस
- कारण बाबासाहेबांनी सांगितलय ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण
- जिथे संकट तिथे शिवसैनिक
- जिथे संकंट तिथे एकनाथ शिंदे धावून गेल्या शिवाय राहणार नाही
advertisement
- मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे
- मदतीला धावून जाण्याचे काम शिवसेना करते
- महापुरा मुळे बळी राजा पुर्ण कोलमडून गेलाय
- आम्ही त्यांच्या मागे आहोत
- अटी शर्ती बाजूला ठेवून बळीराजा मदतीचा हात दिला पाहिजे आधार दिला पाहिजे
- लोकं सांगत होते आम्ही अनेक वर्षात एवढा पाऊस पाहिला नाही
advertisement
- सगळं उध्वस्त झालंय लोकं सांगत होते
- त्यामुळे या मेळाव्यात फक्त आजू बाजूच्या लोकांना बोलावले
- दसरा सण मोठा आहे, आनंदाला नाही तोटा
- या दस-यावर पुराचे सावट आहे
- शेतक-यांवर सावट आहे
- बाळासाहेब असते तर त्यांनी आज पाठ थोपटली असती
- पाऊस वै-या सारखा कोसळला आहे
- इथे सर्व नेते आहेत जेव्हा जेव्हा दुष्काळ आला पूर आला त्यांना त्यावेळेस अन्न धान्य जीवनावश्यक वस्तू जनावरांना चारा नेण्याचे काम शिवसैनिकांनी केलंय
advertisement
- तुम्ही धीर सोडू नका टोकाचे पाऊल उचलू नये
- तुमचे जीव उद्ध्वस्त झाले आहे त्याला उभारी देण्याचे काम हे सरकार करणार
- मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला त्याचे दुःख माहितीये
- शेतक-यांना मदत दिवाळीच्या आत दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे
- तुमची दिवाळी काळी होवू देणार नाही
advertisement
- कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि वॅनिटी वॅन घेवून सोशल मिडियावर सरकार चालवणारा हा एकनाथ शिंदे नाही
- बाळासाहेब म्हणायचे संकटात शिवसैनिक लोकांच्या घरात दिसला पाहिजे
- लोकांना मदत मिळत आहे, मला अनेकांचे फोन आले घरातील गाळ काढला, भांडी दिली अन्न धान्य दिले … आम्ही घरावर तोरण लावले
- मला या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे
advertisement
- विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात
- पण आतले सामान दिसत नाही
- तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा घेवून गेला का?
- आमचे फोटो दिसले , जेव्हा तुमचे फोटो लावून आम्ही लोकांना मदत करत होतो तेव्हा नाही काही बोलले,
- फोटोग्राफरला अजून काय दिसणार फोटोच दिसणार ना
- सर्व सामान पाठवले आहे
- काही लोकं हात हलवत गेले आणि टीका करुन तोंड वाजवत आले
- यांचे दौरे म्हणजे खुर्ची पाहिजेय, काजू. बदाम, पाणी मे उतरे तो सर्दी होती है.
- तिथल्या मेळाव्यात रॅम वॅाक सुरू आहे
- मी कॅामन मॅन आहे
- या एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत घेणारे नाही
- किती योजना मी केल्या
- मी मुंबईत टोल मुक्त केले
- किती तरी काम केले सांगायला गेलो तर दिवस जाईल
- मी कधी बोललो नाही माझे हात रिकामे आहेत
- तुमचे शिवसैनिकांचे हे हातच माझे हात आहेत
- माझे शिवसैनिक माझे ऐश्वर्य आणि संपत्ती आहे
- पॅापर्टी चा हाव तुम्हाला आहे
- बाबासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे
- आम्ही जे दिले त्याचे कोणाला काही बघून दिले नाही
- महापालिका ओरबडून घेतली ती माया कुठे गेली लंडनला
- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नाही ती योजना मी सुरु केलीये
- ५ कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा लाभ दिला
- म्हणुन विधानसभा निवडणूकीत लॅंडस्लाईड विजय दिला
- सर्व निकष बाजूला ठेवून शेतक-यांना मदत दिली जाईल
- पी एम केअर योजना कोविडसाठी होती
- तुम्हाला पंतप्रधान मंत्र्यांवर आरोप करण्याचा अधिकार नाही
- केंद्राने ४६ हजार कोटी दिले होते
- केंद्राने उस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपये इनकम टॅक्स चे माफ केले
- गेल्या ७० वर्षांचा इतिहास बघा कॅांग्रेस ने २ लाख कोटी केले
- तर मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये दिले
- ८ तारखेला मेट्रो तीन चे उद्घाटन करणार
- जर सरकार महाबिघाडीचे असते तर
- एअरपोर्ट झाले नसते सर्व ठप्प झाले असते
- हे प्रगती सरकार आहे स्पीड ब्रेकर सरकार नाही
- कोणावर टिका करताय जे दोन्ही हाताने देतायेत
- केंद्र सरकारने खुप काही दिले महाराष्ट्राला
- इट का जवाब पथ्थर से खुन का जवाब खुन से
- पी चिदंबरम म्हणटले की आंतरराष्ट्रीय दबाव होता म्हणून पाकवर हल्ला केला नाही ही गद्दारी आहे देशद्रोह आहे भेकड पणा आहे
- मोदीजींनी पाकला धडा शिकवला
- ॲापरेशन सिंदूर अभी जारी है हे सांगणारा पंतप्रधान मोदी आहेत
- गिधड की खाल पेहेन के कोई शेर नही होता शेर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी है
- तामिळनाडूमध्ये जी घटना घडली तेथे खासदार श्रीकांत शिंदे गेले ही शिवसेनेची शान आहे
- सुरत भारतातच आहे, आम्हाला त्यांना बोलवायला काहीच हरकत नाही
- तुमचे मेळावे पाक मध्ये घ्यायचा होता ना आणि मुनीरला बोलावले पाहिजे होते
- कारण तुम्ही आमच्या लष्करावर टिका केली संशय घेतला
- राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले त्यांच्या बाजूला बसता तुम्ही हे देश प्रेम आहे का?
- त्यामुळे आमच्यावर टिका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही
- सावरकरांवर टिका करणा-या राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून बसता
- हिंदुत्व काय टीशर्ट आहे का ?
- बाळासाहेब ठाकरे असते तर आज उलटा टांगून धुरी दिली असती
- बाळासाहेब म्हणटले होते माझ्या शिवसेनेची कॅांग्रेस होवू देणार नाही
- यांनी फक्त खुर्ची साठी सगळे घालवले
- पक्षातील लोकांना संपवण्यासाठी कट कारस्थान केले
- हे पक्ष प्रमुख नाही कारस्थान करणारे कट प्रमुख आहेत
- महापालिका निवडणूका झाल्या की त्यांची सावली पण त्यांच्यासोबत राहणार नाही, शिवसैनिक तर सोडा
- निवडणुका आल्या की मुंबई तोडणार मराठी माणूस हे मुद्दे येणार
- हे पाप कोणी केले
- मी सांगतो कोणी मायका लाल जरी खाली आला तरी मुंबई वेगळी करू शकणार नाही
- आता निवडणूक आल्या की मराठी माणूस आठवतो का?
- मुंबईतील मराठी माणसांकरता आपण रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय
- मुंबई मुंबई आहे
- महाराष्ट्र सर्व क्षेत्रात नंबर वन आहे
- देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय
- एक ही भ्रष्टाचाराचा आरोप नाही
- बे दाग पंतप्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचा सार्थ अभिमान आहे
- आम्ही दिल्लीला जातो महाराष्ट्राला भरघोस मदत आणण्यासाठी तुमच्या सारखे जनपथ वर मुजरे करायला नाही
- हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करणार
- या एकनाथ शिंदेंने गिरणी कामगारांना घरे दिली
- १ लाख घरे आम्ही देणार
- RSS वर टीका केली तेच RSS वाले संकटात धावून जातात
- तुम्ही कसले हिंदूत्व वादी
- १०० वर्षे RSS ला झाले त्यांना शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो
- लोकसभा आपण जिंकली विधानसभा आपण जिंकले आणि आता स्थानिक स्वराज संस्था देखील महायुती जिंकणार
- महायुतीची सत्ता मुंबईत आली नाही तर २५ वर्षे मुंबई मागे जाईल
- आपण केलेली कामे लोकां पर्यंत पोहोचवायचे आहे
- सर्वत्र महायुतीचा भगवा फडकवायचा आहे
- कोण कोणाशी युती करतोय याची परवा करु नका
- सर्वांचा हिशोब आमच्याकडे आहे
- मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम करायचो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय
- आणि आता तुम्ही एकनाथ शिंदे म्हणून काम करायचे आहे
- देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिथे टिका केली गेली
- अरे तुमचा नंबर खालून पहिला होता
- अरे किती फास्ट रंग बदलता
- आपापसातील वाद विसरा आणि कामाला लागा
- सर्व शेतकऱ्यांच्या मुलांची ठरलेली लग्ने यांची जबाबदारी शिवसैनिक घेईल
- आम्ही त्यांना बांधिल आहोत
- पुढचे वर्षे महत्वाचे आहे हे शिवसेनेचे जन्म शताब्दी वर्ष आहे
- हे वर्षे शिवसेना जोरदार साजरे करणार
- निवडणुकीला लागा पण शेतकऱ्यांना मदत देखील करा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
फोटोग्राफरला अजून काय दिसणार? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, भाषणातील संपूर्ण मुद्दे