टीम इंडियाचा स्टार दीपक चहर बिग बॉसच्या घरात! स्विंगचा बादशाह कुणाची विकेट काढणार, किती दिवस राहणार?

Last Updated:

टीव्हीवरील सगळ्यात लोकप्रिय रिअॅलिटी शो, बिग बॉस 19 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या या मोसमात आणखी एक नवा ट्विस्ट येणार आहे.

टीम इंडियाचा स्टार दीपक चहर बिग बॉसच्या घरात! स्विंगचा बादशाह कुणाची विकेट काढणार, किती दिवस राहणार?
टीम इंडियाचा स्टार दीपक चहर बिग बॉसच्या घरात! स्विंगचा बादशाह कुणाची विकेट काढणार, किती दिवस राहणार?
मुंबई : टीव्हीवरील सगळ्यात लोकप्रिय रिअॅलिटी शो, बिग बॉस 19 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या या मोसमात आणखी एक नवा ट्विस्ट येणार आहे. भारतीय क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर दीपक चहर लवकरच बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. दैनिक भास्करने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. दीपक चहरची बहीण मालती चहर वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून शो मध्ये प्रवेश करेल. मालती चहरला सोडण्यासाठी दीपक चहर बिग बॉसच्या घरात एन्ट्री करेल, असं वृत्त समोर आलं आहे. याबाबत बिग बॉसच्या निर्मात्यांकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण आहे मालती चहर?

मालती चहर ही फक्त दीपक चहरची बहीण नाही तर अभिनेत्री आणि दिग्दर्शिकादेखील आहे. मालती चहर सदा विया होया जी (2022), 7 फेरे ए ड्रीम हाऊसवाइफ (2024) आणि जीनियस (2018) यासारख्या चित्रपटांमध्ये होती.
मालतीने अनेक सौंदर्य स्पर्धा आणि मॉडेलिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 2009 मध्ये तिने मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला आणि 2014 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ती दुसरी उपविजेती ठरली. 2017 मध्ये तिने मॅनिक्युअर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मालती चहर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिचे चाहते लक्षणीय आहेत.
advertisement

अवेज दरबार बिग बॉसमधून बाहेर

गेल्या आठवड्यात, अवेज दरबारला बिग बॉस 19 मधून बाहेर काढण्यात आले. त्याच्या बाहेर काढण्याने केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर त्याच्या जवळच्या मित्रांनाही धक्का बसला. एल्विश यादवसह अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आणि हा निर्णय "अयोग्य" असल्याचे म्हटले. बिग बॉसच्या घरात आपल्याबद्दल धारणा निर्माण झाली, मी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा परिणाम झाल्याचं अवेज म्हणाला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाचा स्टार दीपक चहर बिग बॉसच्या घरात! स्विंगचा बादशाह कुणाची विकेट काढणार, किती दिवस राहणार?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement